आपलं शहर

BMC Budget 2022 : निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल एवढ्या कोटींची घोषणा

2022-23चा अर्थसंकल्प बघता त्यात 17.70 % टक्क्यांची वाढ झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला देशाचा 2022-23 अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यापाठोपाठ 3 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी आशियातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल बजेट सादर करणार आहेत. कोरोणाच्या पार्श्भूमीवर अर्थसंकल्प ऑनलाईन सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाचे सादरीकरण ऑनलाईन स्वरूपात असल्याने मुंबई मनपाच्या फेसबुक आणि यूट्यूबवर तो लाईव्ह पाहता येऊ शकतो . ( BMC Budget 2022: Mumbai Municipal Corporation announces crores of rupees on the backdrop of elections )

यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईत कोरोनाचा प्रसार आणि वाढणारे साथीचे रोग पाहता आरोग्य यंत्रणेवर अधिक भर दिली जाणार असून नागरी सेवा सुविधा , पायाभूत सुविधा आणि विविध प्रकल्पांवरदेखील भर दिला जाणार आहे. आज सादर होणारा 2022-23चा अर्थसंकल्प 45,949 हजार कोटींचा आहे. 2021-22 साली 39,038 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 2022-23चा अर्थसंकल्प बघता त्यात 17.70 % टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाचे बजेट आतापर्यंतचे सगळ्यात मोठे बजेट आहे.

2022-23च्या अर्थसंकल्पात महानगर पालिकेचं शिक्षण बजेट सादर झाले आहे. पालिकेचं शिक्षण बजेट 3,370 कोटींचे असणार आहे. केंद्रित विद्यापीठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार आहे. नव्या दोन शाळांकरीता 15 कोटींची तरतूद असणार आहे. आयजीएससी आतंरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम आहे, तसेच आयबी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य शिक्षण पद्धतींपैकी एक आहे. या दोन नव्या शिक्षण पद्धती खासकरून मुंबईकर विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत असे पालिकेचे म्हणणे आहे.

2021-22च्या अर्थसंकल्पात पालिका हद्दीत येणाऱ्या शाळांमधील 10वी च्या 19,401 विद्यार्थ्यांना टॅब वाटण्याचा निर्णय झाला होता. यासाठी 7 कोटींची तरतूद राखीव ठेवण्यात आली होती. या टॅबचे विशेष म्हणजे त्यात विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. अधिक क्षमतेची बॅटरी असणाऱ्या या टॅबमध्ये इंटरनेट, Wi-n, LMS सिस्टीम सारख्या सुविधा अंतर्भूत असणार आहेत. मुलींच्या भत्ता पुरवठ्याची एकूण तरतूद 7 कोटी 47 लाख आहे. त्यातील 7 कोटी भत्ता मुख्यतः प्राथमिक माध्यमासाठी आहे आणि उर्वरित 47 लाख माध्यमिकसाठी आहे. शाळांची स्वच्छता तसेच देखभालीसाठी तब्बल 75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments