बीएमसी

मराठी शाळांसाठी शून्य रुपये? 3 हजार कोटींच्या अर्थसंकल्पावर भाजपाचा आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या तीन हजार कोटीच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी मुलांच्या भवितव्यासाठी एकही रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. (BMC Budget 2022)

BMC Education Budget 2022 : मुंबई महानगरपालिकेच्या तीन हजार कोटीच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी मुलांच्या भवितव्यासाठी एकही रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यांनी मराठी माणसाच्या नावावर आयुष्यभर राजकारण केले त्यांना शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी एखादे तरी विशेष पॅकेज जाहीर करावे असे वाटले नाही यावरून त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र असलेल्या खासगी मराठी शाळा गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. निधीची तरतूद होऊनही अनुदान दिले नसल्याने या शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. या शाळांना वाचविण्यासाठी मुंबई मनपाने आपला अनुदान हिस्सा तातडीने देऊन अनुदान सुरू करावे अशीही मागणी वारंवार करण्यात येत आहे. तरीही त्याकडे सत्ताधारी शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे.

पालिका मुंबई पब्लिक स्कूलसाठी विशेष योजना राबवत आहे. मात्र, मराठी शाळांसाठी त्यांच्याकडे निधी नाही. गेल्या दहा वर्षात मराठी शाळेतील पटसंख्या 1 लाख 13 हजारांवरून 35 हजारापर्यंत घसरली आहे. 80 ते 90 मराठी शाळा बंद पडल्या आहेत तर 223 मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही मराठी पाट्या लावण्यावरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नसल्याची टीका प्रतीक कर्पे यांनी केली.

शिक्षण अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद करणार्‍या पालिकेला गेली कित्येक वर्षांत पालक, विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक सेवा सुविधांची माहिती पुरवणारी साधी वेबसाईटही बनवता आलेली नाही. असंही प्रतीक कर्पे म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments