बीएमसी

निवडणुकीआधी BMC ऑन रोड; मजबूत, खड्डेमुक्त आणि टिकाऊ रस्त्यांवर पालिकेचं मास्टर प्लॅन

मुंबईकरांना कर माफ, डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावणे, इतर प्रश्न सोडण्यास सत्ताधारी शिवसेनेने सुरवात केली आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2022) लवकर होणार नाही हे निश्चित झालं असलं तरी सत्ताधारी शिवसेना मुंबईतील कामाला जोरदार सुरवात केली आहे. मुंबईकरांना कर माफ, डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावणे, इतर प्रश्न सोडण्यास सत्ताधारी शिवसेनेने सुरवात केली आहे. यामध्ये आता रस्त्याच्या डागडुजी आणि नवीन रस्ते बनवण्यासाठी सत्ताधारी जोमाने प्रयत्न करत आहे.

मुंबईकरांना खड्डेमुक्त, टिकाऊ आणि मजबूत रस्ते देण्यासाठी यापुढे सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यामध्ये आता 1200 किमीचे रस्ते काँक्रीटचे बनवण्यात येणार आहेत. डांबरी रस्ते लवकरच खराब होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील मजबूत रस्त्यांसाठी पालिकेने 1985 मध्ये पहिल्यांदा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची सुरुवात केली. आतापर्यंत 938.87 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. मुंबईत पालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 2 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. टप्प्याटप्प्याने 1200 किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

मुंबईत आतापर्यंत 938.87 किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर उर्वरित 1 हजार 200 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. पालिकेने 2020 ते 2022 या दोन वर्षांत 200.91 किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू केली आहेत. यातील 163.57 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबईत कमी कालावधीत जास्त पाऊस होतो तर भूजलसाठ्याची पातळी उच्च आहे. तसेच भौगोलिक रचना, मिश्र वाहनांची वर्दळ घनता यामुळे रस्ते खराब होतात. तसेच भूमिगत सुविधांसाठी होणारे खोदकामही रस्ते खराब होण्याचे कारण आहे. रस्त्याशेजारील झोपडपट्टय़ा, रस्त्यांवर होणारे दुकानाचे अतिक्रमण यामुळे रस्ते खराब होत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळेही रस्ते खराब होतात अशी माहिती प्रशासनाने सादर केली आहे.

त्यामुळे मजबूत रस्ते आणि मुंबईकरांसाठी योग्य ती सोया करण्यासाठी सत्ताधारी शिवसेने जोमाने काम सुरू केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments