घटना

Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकी अगोदर मोठी कारवाई, शिवसेना अडचणीत?

दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. तर आज सकाळीच आयकर विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Mumbai : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ईडी, एनसीबी, सीबीआय आणि आयकर विभागाचे ठिकठिकाणी धाड सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. तर आज सकाळीच आयकर विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरू केली.

नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते. याआधी देखील भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटलं जाण्याची शक्यता आहे. तसेच किरीट सोमयांच्या डर्टी 12 मध्ये महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची नाव जोडली गेली असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेमध्ये जवळपास 25 वर्ष महापालिका आपल्या हातात ठेवली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकित स्वतंत्र उतरणार आहे. तर राज्यात असलेला महाविकास आघाडीचा प्रयोग पालिकेसाठी होईल की नाही यावर प्रश्न चिन्ह आहे.

कोरोनामुळे अनेक महानगरपालिकेच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक लवकर होणं शक्य नसलं तरी येत्या काळात शिवसेनेला धाड सत्रामुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामध्येच सोमयांच्या डर्टी डझनमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष असल्याने शिवसेनेसाठी आगामी मुंबई महानगरपालिका भारी पडू शकते अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments