Uncategorized

‘त्या’ कामांमुळे राज्यपालांकडून BMC चा सन्मान

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

BMC New update : कोरोना काळात मुंबईकरांना महापालिकेच्या वतीने उत्तम आरोग्य सुविधा दिल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्राईड ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे  इंडीया एसएमई एक्सलन्स पुरस्कार तसेच प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

कोरोनाच्या काळात पीडितांना आजारातून बाहेर येण्यासाठी त्वरित आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महामारीच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने  उपचार आणि विलिगीकरणासाठी कोविड केंद्रे तसेच विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दर्जेदार शिक्षण, दर्जेदार वातावरण, पिण्यायोग्य दर्जेदार पाणी, इतर वैद्यकीय सेवा, प्रगत सांडपाणी व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता मोहीम, वाहतूक, बाजारपेठ, पथदिवे, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती दरम्यान त्वरित आणि महत्त्वाच्या उपयुक्तता सेवा प्रदान करण्यात आघाडीवर आहे.

विविध उपयुक्तता सेवा सुधारण्यासाठी आणि गुंतवणूकदार आणि अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी मुंबई शहर हे भारतातील इतर शहरांसाठी एक आदर्श आहे. या संपूर्ण कार्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments