राजकारण

BMC ward list : मुंबईत वाढलेल्या प्रभागांचा शिवसेनेला फायदा! वाढलेल्या 9 प्रभागांचं गणित कसं?

मुंबई निवडणुकांचे वारे वाहू लागलंआहे, त्यानंतर प्रभाग रचनांमधून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे.

BMC ward list : मुंबई निवडणुकांचे वारे वाहू लागलंआहे, त्यानंतर प्रभाग रचनांमधून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे. एकाजाबूला भाजपचे सर्व नेते तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत, किशोरी पेडणेकर त्यांना प्रतिउत्तर देताना दिसत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 9 प्रभागांची वाढ करण्यात येणार आहे. त्याबाबत पालिकेने पुनर्रचना आराखडा जाहीर केला. यामध्ये भायकाळा, वरळी, परळ, दहिसर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर हे 9 प्रभाग वाढले आहेत. या 9 प्रभागांची वाढ करण्यासाठी 227 प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाजपने केलेल्या आरोपांनुसार वाढलेले प्रभागांचा फायदा, हा शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे या प्रभागांचा शिवसेनेला कसा फायदा होणार आहे आणि मतांची विवाभागणी कशी केली जाणार आहे, हे पाहणे गरजेचे आहे. प्रभागांची संख्या वाढताच मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे. त्यावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

जिथे प्रभागांची संख्या वाढली आहे, तिथे शिवसेनेचा मतदार वर्ग आहे, तिथे शिवसेनेचे नगरसेवक निवडणूक येण्याची शक्यता असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. वाढलेल्या 9 प्रभागांचं विश्लेषण केल्यास 6 वॉर्डमध्ये शिवसेनेचं मताधिक्य सर्वाधिक आहे तर 3 जागांवर भाजपचं प्राबल्य आहे. हे सगळं सुरु असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र याचा तोटा सहन करावा लागणार आहे, कारण कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं त्या मतदार संघात प्राबल्य आहे, तिथे नवीन वॉर्डांची निर्मिती केली नाही.

आता प्राबल्याच्या दृष्टीने विचार केल्यास परळमध्ये शिवसेनेचे आमदार अजय चौधरींचं वर्चस्व आहे. वरळीमध्ये युवासेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जनादेश आहे, भायखळा येथे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि स्थानिक आमदार व यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव यांचं प्राबल्य आहे. कुर्लामध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत. चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे आमदार आहेत आणि अंधेरी पूर्व येथे रमेश लटके आमदार आहेत. या गणिताचा अभ्यास करुनच शिवसेनेने प्रभाग रचनांची खेळी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

तर भाजपकडून दहिसर येथे वाढलेल्या वार्डमध्ये भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, कांदिवली येथे अतुल भातखळकर, घाटकोपर येथे भाजपाचे पराग शहा आमदार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत आमदारांवर मुख्य जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या मतदार संघातील नगरसेवक निवडून आणणे. त्यामुळे हे  वाढलेल्या वार्डचा फायदा हे भाजपा आणि इतर पक्षांपेक्षा सेनेला जास्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments