अर्थकारण

Union Budget : सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावे?

Union Budget : सर्वाधिक वेळा अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला

Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आज त्यांच्या कारकीर्दीतील चौथा आणि कोरोना संकटानंतराचा सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडला. या वेळेस कोरोना संकटामुळे अर्थसंकल्प पेपरलेस अशा प्रकारचा होता.

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. अर्थमंत्री असताना 22 मार्च 1958 ते 31 ऑगस्ट 1963, 13 मार्च 1967 ते 16 जुलै 1969 दरम्यान त्यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडला होता.

यानंतर पी चिदंबरम यांनी वाणिज्य मंत्री झाल्यानंतर भारतच आयात-निर्यात धोरण सलग 8 तास न थांबता पुन्हा लिहिले आणि 9 वेळा मांडला होता तसेच 1 जुन 1996 – 21 एप्रिल 1997, 1 मे 1997 – 19 मार्च 1998, 23 मे 2004-30 नोव्हेंबर 2008, 31 जुलै 2012- 26 मे 2014 असा यांचा अर्थमंत्री म्हणून कालावधी होता.

प्रणव मुखर्जी यांचा 15 जानेवारी 1982 – 31 ऑक्टोबर 1984, 24 जानेवारी 2009 – 26 जून 2012 असा अर्थमंत्री म्हणून कालावधी होता तसेच त्यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडला होता.

यशवंत सिन्हा यांचा 21 नोव्हेंबर 1990 – 21 जून 1991, 19 मार्च 1998 – 1 जुलै 2002 असा अर्थमंत्री म्हणून कालावधी होता त्यांना देखील 8 वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती.

मनमोहन सिंग यांचा 21 जून 1991 – 16 मे 1996, 30 नोव्हेंबर 2008 – 24 जानेवारी 2009, 26 जून 2012 – 32 जुलै 2012 असा अर्थमंत्री म्हणून कालावधी होता आणि त्यांना 6 वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments