राजकारण

Budget Session : कोरोनाकाळात मुंबईतील मजुरांना काँग्रेसने संकटात ढकललं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना कोरोनाकाळात काँग्रेसने केलेलं कृत्य यावर मोदींनी भाष्य करताना मुंबईतील परिस्थिती सांगितली.

दिल्ली येथे संसदेत अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन (Budget Session) सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली आहेत. आता लोकसभेत या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर दिले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना कोरोनाकाळात काँग्रेसने केलेलं कृत्य यावर मोदींनी भाष्य करताना मुंबईतील परिस्थिती सांगितली. (Narendra Modi Reply President Speech)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पहिल्या लॉकडाऊन काळात देश कोरोना नियमांचे पालन करत होता. पालन करा असंही सांगण्यात येत होतं. संपूर्ण जगात असा संदेश दिला जात असताना, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांना जाण्यासाठी सांगितलं गेलं, तिकीट काढून देण्यात येत होतं. महाराष्ट्रातील ओझं कमी करा आणि उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्ही आमच्या श्रमिक लोकांना मोठ्या त्रासात ढकलून दिलं. आता थेट आरोप बरे मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.

यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उत्तर दिलं आहे, माननीय पंतप्रधान यांचे वक्तव्य हे दुर्देवी आहे, त्यांच्या पदाला शोभणारे नाही. कोरोनाचे संकट (Corona Pandamic) आलं तेव्हा लाखो मजूर हा परराज्यातला होता, आम्ही त्यांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. जेव्हा मजुर गावाकडे जायचं असा आग्रह करू लागला, तेव्हा त्याची पाठवणूक सुद्धा अत्यंत व्यवस्थित केली. तिकिटे काढुली, जेवणाचा डबा दिला. याचे कौतुक पंतप्रधान यांनी केलं असतं तर आनंद झाला असता. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments