स्पोर्ट

Captain Rohit Sharma : मुंबईकर हिटमॅनचा मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून होणार सन्मान

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) रोहित शर्माचा तिन्ही प्रकारचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.

Captain Rohit Sharma : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) रोहित शर्माचा तिन्ही प्रकारचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. रोहित शर्मा हा देशांतर्गत मुंबई संघाचा क्रिकेटपटू आहे. त्याचा आणि अन्य काही खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय एमसीएच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत झाला. हा सन्मान सोहळा IPL 2022 सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

एकदिवसीय, टी-20 मध्ये रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले होते परंतु आता कसोटी संघाचे नेतृत्व सुद्धा त्याच्याकडे आले आहे, अश्या रितीने त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार पद आले आहे. मार्चमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पहिलांदाच रोहित कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.

रोहित शर्मासोबतच अजून काही खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये भारतीय संघातील मुंबईकर खेळाडू सुर्यकुमार यादव व शार्दूल ठाकूर यांचा सन्मान होणार आहे. तसेच अंडर 19 वर्ल्डकप भारतीय टीमचा अंगकृष रघुवंशी यालाही एक लाख रुपयांची रोखरक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचसोबत पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments