
Mumbai Local Update : ठाणे-दिवा स्थानकादरम्यान एक्स्प्रेस गाड्यांसाठी संपूर्ण पाचवी व सहावी मार्गिका उपलब्ध होत आहे. आताच झालेल्या 72 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पण आता त्यांचा ठाणे – दिवा दरम्यान खूप वेळ थांबायचा कायमचा प्रश्न सुटला आहे. पण 8 फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत झाला आहे.
CSMT वरून सुटणाऱ्या व त्या दिशेला जाणाऱ्या सर्व लोकल, मेल, एक्सप्रेस यांना ठाणे-दिवा दरम्यान स्वतंत्र मार्गिका नसल्यामुळे सिग्नल सुटेपर्यंत खूप वेळ थांबावे लागत होते. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह लांब पल्यावरुन येणाऱ्या प्रवाशांनाही खूप त्रास सहन करत लागत होता. ठाणे-दिवा दरम्यान सिग्नल लागला की अर्धा-पाऊण तास प्रवाशांची त्यातून सुटका होत नसत. आणि याचमुळे मध्य रेल्वे नेहमी 10-15 मिनिटे उशिराने धावत असायच्या. पण आता हा प्रवास नीट आणि वेळेत होणार आहे.
4 फेब्रुवारीच्या मध्य रात्री 12 पासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्य रात्रीच्या 12 पर्यंत झालेल्या या 72 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकमध्ये मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आली. 23 जानेवारीला झालेल्या 14 तासांच्या मेगाब्लॉक नंतर पाचवी मार्गिका सुरू करण्यात आली होती. आता 8 फेब्रुवारीपासून पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू करण्यात आली.
2008-09 साली या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली होती नंतर सर्व प्रकिया पूर्ण करुन काम सुरू करण्यात आले होते. पण या मार्गिका 2022 मध्ये उपलब्ध झाल्या.
ठाणे ते कुर्ला आणि दिवा ते कल्याणसाठी स्वतंत्र पाचवी आणि सहावी स्वतंत्र मार्गिका आहे पण ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका नसल्यामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागत होता. दोनच मार्गिकेवरून लोकल, मेल, एक्सप्रेस जात होत्या त्यामुळे एक गाडी जात असताना बाकीच्या गाडीना सिग्नल देऊन थांबवण्यात येत होते त्यामुळे प्रवाशी खूप वैतागत असत त्याच बरोबर वेळचेही तीनतेरा वाजत असत. त्यावर ठाणे-दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका हा कायमस्वरूपी तोडगा आहे. ही मार्गिका मेल, एक्सप्रेससाठी सेवेत येणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक देखील सुधारेल. आणि टप्प्याटप्प्याने लोकलच्या 80 लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.