Chembur Siddharth Colony : सिद्धार्थ कॉलनीतील वीज बिल थकबाकीचा तिढा सुटून विद्युत पुरवठा सुरळीत होणार
विजबिलाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील वीजपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यात येणार आहे.

Chembur Siddharth Colony : विजबिलाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील वीजपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सिद्धार्थ कॉलनीतील विजबिलाचा तिढा सुटला असून यामुळे सुमारे 3500 कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला खासदार शेवाळे यांच्यासह स्थानिक शाखाप्रमुख शेखर चव्हाण, अदानी कंपनीचे अधिकारी आणि सिद्धार्थ कॉलनी तील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार, 2019 पूर्वीची वीजबिलाची थकबाकी विकासकाकडून वसूल करण्यात येणार असून, त्यानंतरच्या वीज बिलावरील व्याज माफ करून केवळ बिलाची रक्कम भरू देण्याची रहिवाशांची मागणीही मान्य करण्यात आली. या बैठकीतील निर्णयामुळे सिद्धार्थ नगर परिसरातील सुमारे 3500 कुटुंबांना दिलासा मिळाला असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन अदानी कंपनी कडून देण्यात आले.