आपलं शहरलोकल

घर झाल्यावर चहाला नक्की बोलवा, मुख्यमंत्र्यांची कुणाला साद?

स्वतःच्या घरासाठी केलेला संघर्ष लक्षात ठेवा, कृपा करून घर विकू नका आणि मुंबई सोडून जाऊ नका, अशी आर्त साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासियांना घातली.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (22 फेब्रुवारी) पत्राचाळ पुनर्विकासाच्या (Patra Chawl Redevelopment) प्रलंबित बांधकामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासियांना आपुलकीने चाहापाण्यासाठी बोलवा अशी साद घातली. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

घरासाठी लढा देणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

पत्राचाळ पुनर्विकासाच्या प्रलंबित बांधकामाचा शुभारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासियांशी संवाद साधला. ते म्हणाले, पत्राचाळीचा विषय अनेकांना माहीत आहे. गेली अनेक वर्ष त्याचं दळण दळलं जातय. पण प्रश्न काही सुटत नव्हता. अनेकांनी यासाठी लढा दिला. आज ते हयात देखील नाही. यासाठी त्यांनी सुभाष देसाई यांचे विशेष आभार मानले, तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचेही आभार मानले.

“हक्काचं घर विकू नका, मुंबई सोडून जाऊ नका”

मुंबईचे महत्त्व मी काही वेगळ्याने सांगायला नको, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येकाला मुंबईत आपले स्वतःचे घर असावे अस नेहमीच वाटत. आणि प्रत्येकाचं स्वतःच घर असावंच असं देखील ते उद्गारले. आपण सगळे ज्या स्वप्नाची वाट पाहत होतो ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्याचं भूमिपूजन आता होत आहे. लवकरच घर सुद्धा मिळेल. जेव्हा सरकारच्या माध्यमातून घरे मिळतात, त्यासाठी केलेला संघर्ष लक्षात ठेवा. तो कदापि विसरू नका. आपल्यातील अनेक जण या स्वप्नाची वाट बघत निघून गेले. त्यामुळे जेव्हा तुम्हाला घर मिळेल, जेव्हा तुम्ही घरात पाऊल टाकाल तेव्हा कृपा करून तुम्ही हे घर विकू नका. घर विकून मुंबई सोडून जाऊ नका. नाहीतर तुम्ही केलेला हा सगळा संघर्ष वाया जाईल, असे मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.

पत्राचाळवासियांना मुख्यमंत्र्यांनी घातली अट

मुंबईत अनेकजण येतात, पोटापाण्यासाठी येतात, मिळेल तिथे राहतात. हक्काचं घर मिळवतात. त्यामुळे तुम्ही घर सोडू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अट घालत पत्राचाळवासियांना म्हणाले. तशी विनंती देखील पत्राचाळवासियांना केली. पुढे बोलताना, घर झाल्यावर चहाला नक्की बोलवा, अशी साद देखील मुख्यमत्र्यांनी घातली, अशी कार्यक्रमात सगळीकडे हशा पिकली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments