मुंबईत ओमायक्रोनबाबत चिंतेचे वातावरण, पालिकेच्या चाचणीमधून उघड
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 282 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

एकीकडे मुंबईतील कोरोणाची रुग्णसंख्या कमी होत असली आणि मृत्यू शून्य आढळत असला तरी मुंबईतील ओमायक्रोन बद्दल चिंतेचे वातावरण आहे. अस पालिकेने केलेल्या चाचणीमधून उघड झाले आहे.
कोरोना विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणाऱ्या चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत नवव्या तुकडीमध्ये मुंबईतील 190 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
यात ओमायक्रॉनचे 94.75 टक्के रुग्ण आढळले आहेत. या 190 पैकी 23 रुग्णांचा मृत्यू ओढवला. पैकी 21 रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते. एवढेच नव्हे तर या 23 पैकी 15 जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. त्यामुळे कोविड लसीकरण आवश्यक असल्याची बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 282 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 190 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 190 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत.
सदर 190 रुग्णांचे वयानुसार वर्गीकरण
0 ते 20 वर्षे वयोगट – 17 रुग्ण रुग्ण (9 टक्के)
21 ते 40 वर्षे वयोगट – 36 रुग्ण (19 टक्के)
41 ते 60 वर्षे वयोगट – 41 रूग्ण (22 टक्के)
61 ते 80 वयोगट – 71 रुग्ण (39 टक्के)
81 ते 100 वयोगट – 22 रुग्ण (12 टक्के)
विड विषाणू उपप्रकारानुसार या 190 बाधित रुग्णांचे वर्गीकरण
ओमायक्रॉन – 180 रुग्ण (94.74टक्के)
डेल्टा व्हेरिअंट – 3 रुग्ण (1.58 टक्के)
डेल्टा – 1 रुग्ण (0.53 टक्के)
इतर – 6 रुग्ण (3.16 टक्के)
190 पैकी वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये 13 जनांपैकी, 11 जणांना ओमायक्रॉनची बाधा,एका जणास डेल्टा डेरिव्हेटीव्हची बाधा, एक जणास इतर उप प्रकाराची लागण. कोविड लसीकरण निकष लक्षात घेता, 190 पैकी 106 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी, पहिला डोस घेतलेले 5 जण रुग्णालयात दाखल. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी 50 जण रुग्णालयात दाखल. लसीचा एकही डोस न घेतलेले 51 जण रुग्णालयात दाखल.