कोरोनाची चौथी लाट ? नक्की काय आहे ते जाणून घ्या
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे भारतीय खूप त्रस्त झाले होते. अनेकांनी आपली माणसे गमावली पण काहींनी कोरोनाला हरवले. तसेच कोरोनाची तिसरी लाट जास्त तीव्र नसल्यामुळे नागरिकांना तेव्हा जास्त त्रास झाला नाही.

Corona Fourth Wave : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे भारतीय खूप त्रस्त झाले होते. अनेकांनी आपली माणसे गमावली पण काहींनी कोरोनाला हरवले. तसेच कोरोनाची तिसरी लाट जास्त तीव्र नसल्यामुळे नागरिकांना तेव्हा जास्त त्रास झाला नाही.
पण आता कोरोनाची चौथी लाट जूनच्या अखेरीस येऊ शकते असा दावा कानपूरच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लाट जूनच्या मध्यापासून अखेरपर्यंत असू शकते. तसेच 4 महिने वेगवान राहील. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे संकेत मिळाले आहेत. कोरोनाच्या व्हेरिएंटवर या लाटेची तीव्रता अवलंबून असेल.
आयआयटी कानपूरच्या गणित विभागातील साब्रा प्रसाद राजेशभाई, शुभ्रा शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात झिम्बाब्वेच्या डेटावर आधारित गुस्सेन डिस्ट्रिब्युशनचे मिश्रण वापरले गेले. हा अभ्यास 24 फेब्रुवारी रोजी प्रीप्रिंट सर्व्हर MedRxiv वर प्रकाशित झाला होता, परंतु अद्याप त्यावर समीक्षकांचे पुनरावलोकन करणे बाकी आहे.
तसेच लेखकाने म्हटले आहे की, डेटा सूचित करतो की कोविड -19ची चौथी लाट कोविडच्या सुरुवातीच्या तारखेपासून 936 दिवसांनी भारतात येईल म्हणजेच 30 जानेवारी 2020. आणि ते म्हणाले, अशा प्रकारे चौथी लाट 22 जून 2022 पासून सुरू होईल आणि 23 ऑगस्ट 2022 पर्यंत शिखरावर पोहोचेल तर ही लाट 24 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल, असाही दावा करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएनटचा प्रभाव संपूर्ण ॲनालिसीसवर होऊ शकतो. त्याच्या प्रभावाची तीव्रता संसर्गजन्यता, मृत्यूचे आकडे इत्यादींवर अवलंबून असेल. तसेच, लसीकरणाचे दोन्ही डोस हे देखील महत्त्वाची भूमिका बजावेल.
आयआयटी कानपूरने यापूर्वीही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती की फेब्रुवारीच्या सुरवातीला कोरोना येईल आणि मग हळूहळू रुग्णांमध्ये घट होईल. आणि हा अंदाज अगदी बरोबर निघाला आहे. त्यामुळे आयआयटी कानपूरच्या चौथ्या लाटेच्या दाव्यामुळे चिंतेत भर पडली आहे.