एकदम जुनं

शेअर मार्केटपेक्षा कापसामुळे मुंबईला सातासमुद्रापार ओळख मिळाली होती…

मुंबईला गरणीची सवय लागायला सुरुवात झाली, याचदरम्यान व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावायला सुरुवात झाली. आ

Mumbai Mills History : मुंबईचं आणि महाराष्ट्राचं सोन म्हणून ओळखलं जायचं, ते इथल्या कापडाला. सुरुवातीला हातमाग आणि चरख्यावर कपड्याला आकार दिला जायचा. मात्र 1854 साली ताडदेव परिसरात ‘दी बाँबे स्पिनिंग आणि विव्हिंग कंपनीची’ स्थापना झाली आणि मुंबईला गरणीची सवय लागायला सुरुवात झाली. याचदरम्यान व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावायला सुरुवात झाली. आणि 1870 पर्यंत मुंबईत पंचवीस गिरण्या उभारल्या. (Mumbai Mills Case)

यावेळी व्यापाऱ्याच्या उद्देशाने देशात आलेला इंग्रजही स्थिरावला होता. इंग्लंडमधील गिरणींची यंत्रणा, ब्रिटीश कंपन्यांकडू येणारं यंत्रमाग साहित्य यामुळे भारतात कापड उद्योगाचा सुर्योदय होण्यास सुरुवात झाली. मुंबईच्या दक्षिण – मध्य भागात गिरण्यांसाठी उपयुक्त अशी जागा मिळाली. तर त्यालाच लागून फोर्ट असल्याने मुंबईतला माल परदेशात घेऊन जाण्याची साधी व्यवस्थाही निर्माण झाली होती. याचाच विचार करून मुंबईत ज्या ठिकाणी गिरण्या उभारल्या, त्यालाच गिरणगाव म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. (Mumbai Mills Story)

या वेळी हुशार निघाले ते पारशी आणि मारवाडी लोक. मुंबईत कापड उद्योग वाढतोय हे जेव्हा त्यांना कळायला सुरुवात झाली, तेव्हाच त्यांनी 99 वर्षांच्या भाडेतत्वावर गिरण्यांची जागा मिळवण्यास सुरुवात केली आणि स्वत:च्या गिरण्या उभ्या केल्या. याचच कारण की विदर्भातला झाडून पुसून सगळा कापूस मुंबईकडे येऊ लागला. यातल्या सर्रास कापसावर मुंबईत प्रक्रिया होऊ लागली, तर काही कापसावर थोडीफार प्रक्रिया करुन परदेशात पाठवला जाऊ लागला. या धंद्यातून प्रेमचंद रायचंदसारखे व्यापारी उदयास आले. यांना कॉटन किंग म्हणूनही एकेकाळी ओळखलं जायचं. (Why Mumbai Mills Shut Down)

तुम्हाला मुंबईचा राजाबाई टॉवर माहिती असेल, तो मनोरा याच प्रेमचंद रायचंदने आपल्या आईची आठवण म्हणून बांधला होता. 1860 साली या टॉवरवर 2 लाख रुपये खर्च झाले होते, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यावेळी कापसाचा धंदा करणाऱ्यांकडे किती पैसा असायचा. कापूस आणि कापड उद्योगांमुळे 1865 च्या काळात मुंबईमध्ये 31 बँका, 8 समुद्रात भर टाकणाऱ्या कंपन्या, 10 जहाज कंपन्या, 20 कामगार विमा कंपन्या आणि इतर उद्योगांच्या 62 कंपन्या मुंबईत स्थिरावल्या. (old mills in mumbai)

10 – 20 वर्षांच्या काळात विदर्भाच्या कापसाने मुंबईला इतकं उभारीला आणलं की तसं श्रिमंत शहर कोणतं झालच नसावं, मात्र मुंबईचा विकास होण्यामागे फक्त विदर्भाचा कापूस महत्त्वाचा नव्हता, तर ब्रिटीशांनी कपड्याला आणि कापसाला दिलेली किंमत होती, अशी माहिती लेखक एस. हुसेन झैदी यांच्या भायखळा ते बँकॉक या पुस्तकात दिली आहे. मात्र या कापसाची चमक जास्तवेळ टिकली नाही. कापड गिरण्या आणि त्याच्या संबंधित अनेक कंपन्यांचं दिवाळं निघू लागलं.(Textile Mills in Mumbai)

पुढे कापड गिरण्यांचं काय झालं, गिरण्यांमध्ये काम करणाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागला, गिरणी मालकांसह तेथील कर्मचाऱ्यांची काय हालत झाली, हेच आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत. (Mumbai Mills History)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments