नॉलेज

कोरोना काळातील धारावी मॉडेल; संपूर्ण आराखडा, फक्त एकाच ठिकाणी

पुस्तकाद्वारे कोरोना काळातील बहुचर्चित धारावी मॉडेल समजून घेण्यास उपलब्ध

Dharavi model : कोरोनाचा पादुर्भाव नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये धारावी सारख्या आव्हानात्मक परिसरात करण्यात आलेल्या अथक आणि नियोजनबध्द प्रयत्नांचा  समावेश होता. धारावी परिसरातील विविध स्तरीय कार्यवाहीची – अनुभवांची अत्यंत अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक व संशोधकीय नोंद जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ‘द धारावी माॅडेल’ या इंग्रजी पुस्तकात केली होती. या इंग्रजीत गाजलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनावर  नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे धारावी सारख्या अत्यंत आव्हानात्मक परिसरात अथक प्रयत्न करण्यात आले. धारावीत कोरोना नियंत्रण किती आव्हानात्मक होते, आहे याची सर्वांना कल्पना असल्याने  येथील प्रयत्नांना लाभलेल्या यशाची नोंद जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील विविध संस्था, संघटना व माध्यमांनी दखल घेतली. या प्रयत्नांनचे धारावी माॅडेल असे नाव देऊन कौतुकही केले.

याच धारावी मॉडेल मधील अनुभवांवर आधारित द धारावी मॉडेल या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  14 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री  यांनी महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.  मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी हे पुस्तक मराठीत यावे, मराठी वाचकांपर्यंत देखील पोहोचावे, यादृष्टीने या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्याची सूचना किरण दिघावकर यांना केली होती.

त्यानुसार दिघावकर यांनी कुणाल मांडेकर, बृहन्मुंबई महानगरपालिका येथील निवृत्त सहा प्रमुख कर्मचारी अधिकारी शामल विलास रावराणे आणि निवृत्त उपशिक्षणाधिकारी रवींद्र दत्तात्रेयराव काळे यांच्या प्रयत्नातून हे पुस्तक मराठीत आले आहे. या पुस्तकात धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे, अशी माहिती या पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर यांनी दिली.

हे पुस्तक आता मराठीत देखील उपलब्ध झाल्याने मराठी वाचकांना धारावी मॉडेल समजावून घेणे अधिक सुलभ होणार आहे. द धारावी मॉडेल हे मराठी भाषेतील पुस्तक इंग्रजी आवृत्ती प्रमाणेच ‘ई- बुक’ स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments