बीएमसी

देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र आता मुंबईमध्ये

Dharavi Suvidha Centre : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कार्यक्षेत्रातील धारावी परिसरात लोकार्पण करण्यात आलेल्या या एकाच सुविधा केंद्रात तब्बल 111 शौचालय असल्याने ते देशातील सर्वात मोठे सामुदायिक शौचालय ठरले आहे.

मुंबईकरांना स्वच्छतेच्या विविध सोयी सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने मुंबईत विविध ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केंद्रे विविध कंपन्यांच्या व संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येत आहेत. ही सुविधा केंद्रे अधिकाधिक पर्यावरण-पूरक पद्धतीने उभारण्यात येत असल्याने या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करण्यासह वापरलेल्या पाण्याचे तर चक्रीकरण करून त्याचा पुन्हा वापर करण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि युनायटेड वे मुंबई, हिंदूस्थान युनीलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून, सामाजीक दायित्व उपक्रमांतर्गत जी उत्तर विभागातील धारावी पंपींग परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पध्दतीच्या दुमजली सार्वजनिक केंद्राचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले.

या सुविधा केंद्रामध्ये पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था आहे. तसेच लहान मुले आणि अपंगांकरिता 111 शौचालय आणि 8 स्नाहगृहे यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments