दिदींच्या अस्थी मंगेशकर कुटूंबाकडे सुपूर्द, दिदींच्या चाहत्यांची आजही शिवाजी पार्कात हजेरी
सकाळपासून महानगरपालिकेचे कर्मचारी शिवाजी पार्क तेथे हजर होते.

तब्बल 28 दिवसांच्या कोरोनाच्या झुंज देत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणजोत आज मावळली. रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या निधनानंतर केंद्राने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. आज राज्यसरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल 7 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दिदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ( Didi’s bones handed over to Mangeshkar family, Didi’s fans still attend Shivaji Park )
दिदींच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून आदिनाथ मंगेशकर दिदींच्या अस्थी प्रभुकुंज या निवासस्थानी घेऊन जाणार आहेत. सकाळपासून महानगरपालिकेचे कर्मचारी शिवाजी पार्क तेथे हजर होते. तसेच सकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर दाखल झाले होते. मंगेशकर कुटुंबातील सदस्य शिवाजी पार्कात आले तेव्हापासून नार्वेकर त्याठिकाणी सर्व कामात लक्ष घालत होते.
काल दिदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अनेक चाहते शिवाजी पार्कात दाखल झाले होते. अनेक राजकीय नेते शिवाजी पार्कात दिदींच्या अंत्यसंस्कारावेळी हजर असल्याने सामान्य नागरिकांना दर्शन मिळाले नव्हते त्यामुळे दिदींच्या अनेक चाहत्यांनी सकाळपासून तिथे गर्दी केली होती.
हे हि वाचा: