राजकारण

penguin issue : पेंग्विनच्या प्रेमावरून किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ पुन्हा भिडल्या

महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुजरातला जाऊन तेथील पेंग्विण सेक्टरची पाहणी केली.

Penguin Issue : महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुजरातला जाऊन तेथील पेंग्विण सेक्टरची पाहणी केली. आज मुंबईत महापौर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मुंबईतील पेंग्विन सेक्शन आहे, तो मुंबई महानगरपालिका चालवते आणि अहमदाबाद महानगरपालिकेचे पेग्विन पार्क कंत्राटदार चालवत आहेत आणि तिथला प्रत्येक प्राणी पाहण्यासाठी वेगळी तिकीट आकारली जात आहेत.

यानंतर यावरून आदित्य ठाकरेंवर सतत टीका करणाऱ्या आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यासारख्या नेत्यांना आता ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचं का? असा खोचक सवाल उपस्थित करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौरांना प्रतिउत्तर दिलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) स्वत: 550 किमी प्रवास करत गुजरातमध्ये पेंग्वीनच्या भेटीला गेल्या. पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. असा निशाणा भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp Leader Chitra Wagh) यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर साधला आहे.

महापौर यांनी त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात, हेही त्यांनी स्वताचं जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच. असो, त्यांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची तारीफ केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे. आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्वीनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवरती त्यांना काही देणं घेणं नाही. असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौरांवर केला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासून भाजप आणि शिवसेना यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments