राजकारण

तुमच्या राजकारणासाठी शिवाजी पार्कचा बळी देऊ नका, संदीप देशपांडे यांची विनंती

संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे चर्चेत आले आहे. भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर, या मैदानातच त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर माणसे नेते संदीप देशपांडे यांनी जे ट्विट केले आहे. याअगोदर भाजपा आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्क येथे दिदींच भव्य स्मृतिस्थळ व्हावं अस पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहल होत. यामध्ये मनसेने आपली भूमिका मांडली आहे. ( Don’t sacrifice Shivaji Park for your politics, request of Sandeep Deshpande )

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती. अस ट्विट संदिप देशपांडे यांनी केलं असून यामुळे शिवाजी पार्कचा मुद्दा चर्चेत आहे.

लता दिदींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भव्य अस स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे अस पत्र लिहल होत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनीही मागणी केली. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही लता दीदींचे भव्य स्मारक उभारणार आहोतच, कुणीही मागणी करून राजकारण करण्याची गरज नाही झ संजय राऊत म्हणाले होते.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments