राजकारण

राज्यातले मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत का? हा लता दिदींचा अपमान? भाजपा नेत्याचा सवाल 

लता दीदी सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी होत्या म्हणून हे अस झाल का?

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्य सरकारने दुखवटा तसंच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. देशासह राज्यात देखील दुखवटा जाहीर करण्यात आला होता. देशात आणि राज्यात सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असताना सांगलीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. दरम्यान दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतरही कार्यक्रम घेतल्याने भाजपाकडून टीका केली जात आहे. ( Don’t the ministers of the state follow the orders of the Chief Minister? Is this an insult to Lata Didi? Question of BJP leader )

यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संपुर्ण देश दुःखात असतानाही सांगलीत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम कार्यक्रम घेतात हा लतादींदींचा अपमान आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दुखवट्याबाबत अधिसूचना काढून देखील तुमचे मंत्री कार्यक्रम घेतात। त्यामुळे राज्यातले मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत. हा लता दिदींचा अपमान आहे अस मोहित कंबोज म्हणाले.

लता दीदी सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी होत्या म्हणून हे अस झाल का? असाही सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे. या मंत्र्यानी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments