मंत्रालय

Dr. Babasaheb Ambedkar Village : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाला भेट देणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 12 फेब्रुवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी म्हणजेच मंडणगड तालुक्यातील आंबडवेला भेट देणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 12 फेब्रुवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी म्हणजेच मंडणगड तालुक्यातील आंबडवेला भेट देणार आहेत. ते मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. खरंतर, राष्ट्रपती कोविंद यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या गावाला भेट द्यायची होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही म्हणून राष्ट्रपती 12 फेब्रुवारीला भेट देणार आहेत. पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदारांनी 1 फेब्रुवारीला आंबडवे गावाला भेट दिली. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची जोरदार तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे.

केंद्र सरकारच्या डीएनटी आयोगाचे माजी अध्यक्ष व केंद्राच्या डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेलफेअर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडणगड तालुक्यातील मूळगाव आंबडवे भेटीचे निमंत्रण दिले होते. या भेटीचे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे.

मंडणगड शहरापासून 4 किलोमीटर लांबीवर असलेल्या शिरगाव इथे मोकळ्या मैदानावर पक्के डांबरीकरण केलेले हेलिपॅड निर्मितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाने प्राधिकरणाने दौऱ्यानिमित्त बनविण्यात आलेले हॅलिपॅड लोणंद- आंबडवे राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळे या मार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
31 जानेवारी रोजी हे निमंत्रण स्वीकारले असून, 12 फेब्रुवारी 2022 ही भेटीची तारीख निश्चित झाली आहे. केंद्र सरकारच्या डीएनटी आयोगाचे माजी अध्यक्ष दादा ईदाते यांनी 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रपती भवनात हे निमंत्रण दिले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments