Uncategorized

E Passport : देशात लवकरच सुरू होणार ई-पासपोर्ट, जाणून घेऊयात नक्की काय आहे? ई-पासपोर्ट? काय आहेत फायदे?

डिजिटल युगामध्ये सर्वच डिजिटल झाल्यामुळे लोकांना फार सोपं काम झाले आहे.

E passport : देशात काल केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्थसंकल्पात अनेक मोठं मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकीच एक म्हणजे देशात लवकरच ई पासपोर्ट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सभागृहात केली.

जर आपल्याला भारताच्या बाहेर जायचे असेल तर आपल्याकडे पासपोर्ट असणे फार गरजेचे आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पासपोर्ट कामाला येतो. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक पासपोर्ट आहे. डिजिटल युगामध्ये सर्वच डिजिटल झाल्यामुळे लोकांना फार सोपं काम झाले आहे. घरबसल्या आपण आता पासपोर्टसाठी अप्लाय करू शकतो. त्यापूर्वी जाणून घेऊयात हे ई-पासपोर्ट नक्की आहे तरी काय? (What is the difference between e-passport and non e-passport?)

ई-पासपोर्ट हे साधारण पासपोर्टचेच डिजिटल स्वरूप आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप लावलेली असेल. या चिपमध्ये पासपोर्ट होल्डरच नाव, जन्मतारिख आणि अजून काही माहिती समाविष्ट असेल. (When e-passport will start in india?)

ई-पासपोर्ट असल्यावर नागरिकांना लांब रांग लावायची गरज नसणार. इमिग्रेशन काउंटरवर काही मिनिटातच ई पासपोर्ट स्कॅन केला जाईल. एवढेच नाही तर यामुळे खोटे पासपोर्ट धारकांवरही लगाम लागेल, कारण मायक्रोचिपसोबत कोणीही कुठल्याही प्रकारची छेडखाणी करू शकणार नाही. (What is ePassport look like?)

साधारण पासपोर्ट हरवणे, फाटणे, जळून जाणे, इ. गोष्टीपासून आपल्याला सुटका ई-पासपोर्टमुळे मिळणार आहे. त्यासोबतच आपली सर्व माहितीसुद्धा सुरक्षित राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ई-पासपोर्टसाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करायची गरज नाही. जसे आपण साधारण पासपोर्टसाठी अप्लाय करत होतो तसेच यासाठीही करू शकतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments