घटना

मुंबईतून निघालेल्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, 70 प्रवाशी थोडक्यात बचावले?

इंजिनचे कव्हर निघण्याची घटना तेव्हा होते जेव्हा त्याचे लॅम्प बरोबर बंद नसतात. उड्डाणापूर्वी क्रूने ते एकदा पाहायला हवे होते.

मुंबईतून भुजकडे निघालेल्या अलायन्स एअरचे “ATR72-600 एयरक्राफ्ट VT र्कज” मोठ्या दुर्घटनेतून बचावले आहे. रिपोर्टनुसार, हे विमान मुंबईत असताना टेक ऑफच्या पूर्वी एकदम परफेक्ट होते पण टेक ऑफच्या दरम्यान धावपट्टीवर इंजिन कव्हर निघाल्याने मोठी जीवित हानी होता होता वाचली आहे. विमानात ४ क्रू मेम्बर्ससह ७० प्रवासी उपस्थित होते. मुख्य गोष्ट म्हणजे यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. विमानाचेही फारसे नुकसान झालेले नाही. (Emergency landing of a flight from Mumbai, 70 passengers briefly rescued?)

धावपट्टीवर इंजिन कव्हर पडल्याचे लक्षात येताच मॉनिटरिंग एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून फ्लाईटच्या कॅप्टनला वेळीच अलर्ट करण्यात आले. या संबंधित कळताच विमानाची एमेरजंन्सी लँडिंग करण्यात आली. त्यामुळे होणारा अपघात वेळीच टाळण्यात यश आले. यात जैविक आणि विमानाची कोणतीच हानी झाली नाही आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आजची दुर्घटना निकृष्ट देखभालीचा परिणाम आहे. “इंजिनचे कव्हर निघण्याची घटना तेव्हा होते जेव्हा त्याचे लॅम्प बरोबर बंद नसतात. उड्डाणापूर्वी क्रूने ते एकदा पाहायला हवे होते, असे एविएशन एक्स्पर्ट कॅप्टन अमित सिंह यांनी सांगितले.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments