क्राईम

EPFO Fraud : तुमच्या PF अकाउंटमधील पैसे कुठे गेले? पोलिसांनी लावला 13 लाखांचा छडा

या कारवाईमधून तब्बल 13 लाख 40 हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. मुंबईत 4 ठिकाणी छापा टाकण्यात आला होता.

EPFO Fraud : बुधवारी, 02 फेब्रुवारी रोजी CBI ने मुंबईमध्ये बोगस PF अकाऊंटचा भांडाफोड केला आहे. EPF फ्रॉडच्या केस संबंधित छापा टाकला असता नवं प्रकरण समोर आलं आहे. या कारवाईमधून तब्बल 13 लाख 40 हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. मुंबईत 4 ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये 10 लाख रुपये सिनियर सुपरवायझरकडून आणि 3 लाख 40 हजार रुपये सोशल सिक्युरिटी असिस्टेंटकडून ताब्यात घेतल्याची माहिती CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (CBI Arrested 8 EPFO employees in Mumbai for Rs 18.97 crore Fraud)

काही दिवसांपूर्वीच EPFO (Employees’ Provident Fund Organisation – कर्मचारी भविष्य निधी संघटन) दिल्लीतील मुख्य कार्यालय यांच्या तक्रारीनंतर CBI ने 6 पेक्षा जास्त लोकांविरुध्द FIR दाखल केला होता. यामध्ये सीनियर सोशल सिक्योरिटी असिस्टेंट, सोशल सिक्युरिटी असिस्टेंट, डाटा प्रोसेसिंग असिस्टेंट यांच्यासोबत अजून 3 असिस्टेंट प्रोविडेंट फंड कमिश्नर हे प्रमुख आरोपी होते. सर्व आरोपी मुंबईमधील कांदवलीच्या ईपीएफओच्या कार्यालयात काम करत होते.

या आरोपींनी 712 बोगस PF अकाउंट चालू केले होते. हे सर्व अकाउंट्स त्यांच्या बंद झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने होते. ह्या कर्मचाऱ्यांच्या PF अकाऊंटला जमा झालेले पैसे हे स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून घेत असत. असेच करत त्यांनी जवळजवळ 19 कोटींची रक्कम जमा केली होती. ती सर्व रक्कम CBI ने ताब्यात घेतली आहे, ज्यांच्या अकाऊंटवरून ही रक्कम ट्रान्सफर करून घेण्यात आली होती, त्यांच्या अकाऊंटवर ही रक्कम कशी जाईल, याबाबत लवकर माहिती देऊ, असं मत CBI अधिकाऱ्यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments