राजकारण

Amruta Fadnavis : ‘मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे ते विसरून जा’, मिसेस फडणवीसांनी सांगितलं मुंबईकरांच्या घटस्फोटाच कारण

मुंबईतील 3 टक्के जोडप्यांचे घटस्फोट हे मुंबईतील ट्राफिकमुळे होतात, असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.

Amruta Fadnavis : मुंबईतील 3 टक्के जोडप्यांचे घटस्फोट हे मुंबईतील ट्राफिकमुळे होतात, असा दावा विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.

मुंबईत अनेक समस्या सुरू आहेत. मेट्रोचे काम, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न सध्या सुरू आहेत, त्यात मविआ सरकार यापैकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही, राज्यसरकार फक्त आरोपप्रत्यारोप करत असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केलाय.

अमृता फडणवीस यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. स्त्रियांनी आधीच खूप भोगलं आहे. त्याच्यात आता स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करणे चुकीच आहे, आपल्या देशात स्त्रियांविषयी काही बोललं गेलं किंवा त्यांच्यावर अत्याचार झाल्यावरच आंदोलने होतात. पण हा प्रश्न मानसिकतेचा आहे. आपल्याला स्त्रियांबाबत बोलताना विचार करुन बोलायला पाहिजे. असा टोलाही मिसेस फडणवीस यांनी लगावला आहे.

मुंबईतील ट्राफिकवर बोलताना मिसेस फडणवीस यांनी एक वेगळं विधान केले आहे. मी नेहमी सामान्य स्त्री म्हणून बोलते,  मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे, हे विसरुन जा. मी रोज सामान्य स्त्रियांसारखी घरातून बाहेर पडते, मलाही खड्डे आणि ट्रॅफिकचा खूप त्रास होतो, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेक पत्नी पती वेळेत घरी पोहचत नाहीत, एकमेकांना योग्य वेळ देत नाहीत, याच कारणामुळे जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय.

मी मुंबईतील समस्यांवरुन बोलले की अनेकजण माझ्या मानसिकतेबद्दल बोलतात, असा टोलाही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या महिला नेत्यांना लगावला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments