फेमस

गंगूबाईंने जेव्हा थेट पंतप्रधान नेहरूंना लग्नाची मागणी घातली तेव्हा….

गंगा हरजीवनदास काठियावाडी म्हणजेच कामाठीपुरा वासीयांची गंगू माँ आणि संपूर्ण मुंबईची गंगुबाई

Gangubai Real Story : गंगा हरजीवनदास काठियावाडी म्हणजेच कामाठीपुरा वासीयांची गंगू माँ आणि संपूर्ण मुंबईची गंगुबाई. लेखक आणि पत्रकार हुसेन झैदी यांच्या माफिया क्विन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiyawadi) चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदर गंगुबाईंबद्दल अनेक किस्से चर्चेली जात आहेत. गुजरातमधल्या काठियावाडमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यानंतर गंगुबाई मुंबईत आल्या. कामाठीपुरा येथे गंगुबाई वास्तव्यास होत्या. तिथे चालणारा वेश्या व्यवसायातील मुलींना वाचवणे व सामाजिक काम करण्यात गंगुबाई अग्रेसर होत्या. (Did Ganguly really ask Prime Minister Nehru to marry her?)

1960 च्या दशकामध्ये कामाठीपुरा परिसरामध्ये सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा उभी राहिली. तरुण मुलांच्या मनावर या वेश्या आणि वेश्या व्यवसायामुळे विपरीत परिणाम होईल, असं सांगत या रेड-लाईट एरयाचा काही भाग रिकामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली.

यामुळे शतकभर जुन्या कामाठीपुऱ्यातल्या अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. आपल्या सगळ्या ओळखी पणाला लावत गंगुबाईंनी हा मुद्दा लावून धरला. आपल्या राजकीय ओळखींच्या मदतीने त्यांनी थेट तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या भेटीची वेळ मिळवली. या भेटीची अधिकृत नोंद कुठेही नसली तरी गंगुबाई यांचा नातू विकास गौडा यांनी सांगितला आहे.

या बैठकीमध्ये गंगुबाईंनी नेहरूंना आपल्या हजरजबाबीपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने चकित केलं. त्यांना स्वतःसाठी चांगली नोकरी वा नवरा मिळवणं शक्य असताना त्या या व्यवसायात का आल्या, असं नेहरूंनी त्यांना बैठकीदरम्यान विचारलं. निडर स्वभावाच्या गंगुबाईंनी तिथल्या तिथे नेहरूंनाच लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं. श्रीमती नेहरू करून घेण्याची त्यांची तयारी असल्यास धंदा कायमचा सोडून द्यायची आपली तयारी असल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं.

यामुळे काहीसा धक्का बसलेल्या नेहरूंनी गंगुबाईंना अशा वक्तव्यासाठी समज दिली. यावर गंगुबाई शांतपणे उत्तरल्या, चिडू नका प्रधानमंत्रीजी, मला फक्त माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणं नेहमीच सोपं असतं. पण तसं करणं कठीण असतं. असा महत्वपुर्ण प्रसंग विकास गौडा यांनी सांगितला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments