समाजकारण

Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे टेन्शन ; पे टीएम करत आहे तुम्हाला ‘टेन्शन फ्री ‘..

ऑफर अशी आहे की, जर तुम्ही पे टीएम वापरत असाल तर तुम्ही पेमेंट न करताही गॅस मागवू शकता. पण तुम्हाला त्याचे पेमेंट पुढील महिन्यात करणे अनिवार्य आहे. 

गॅसचे गगनाला भिडत चाललेले दर सामान्य कुटुंबांसाठी डोकेदुखीचे प्रमुख कारण बनत चालले आहे. कोरोना महामारीमध्ये सामान्यांचे फार हाल होत होते त्यात महागाईदेखील वाढत चालली होती. या महागाईने देशातली सामान्य जनता फार त्रासली होती. पण आता टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. कारण, पे टीएमने ग्राहकांच्या गॅस बुकिंगसाठी काही नव्या सुविधा लाँच केल्या आहेत. यातून सामान्यांना खूप फायदादेखील होणार आहे. ( Gas Cylinder Price: Tension of increasing rate of gas cylinder; Pay TM is making you ‘tension free’ … )

गेल्या गुरुवारी या ऑफरची आधिकृत घोषणा करण्यात आली आणि ती लागुही झाली. पे टीएमवर आधीपासूनच गॅस बुकिंग केल्यावर ऑफर आणि कॅशबॅक मिळण्याच्या सुविधा आहेत पण यात नवीन ऑफर्सची वाढ झाल्याने पे टीएम युजर्सना दिलासा मिळाला आहे.

ऑफर अशी आहे की, जर तुम्ही पे टीएम वापरत असाल तर तुम्ही पेमेंट न करताही गॅस मागवू शकता. पण तुम्हाला त्याचे पेमेंट पुढील महिन्यात करणे अनिवार्य आहे.

यापुढे पे टीएमवरून एलपीजी सिलिंडर बुक करणाऱ्या ग्राहकांना 30 रुपयांचा पूर्ण कॅशबॅकदेखील मिळणार आहे. यासाठी ‘FIRSTCYLINDER’ म्हणून प्रोमोकोड दिला आहे. ग्राहकांना बुकिंगच्या वेळी या प्रोमोकोडचा उपयोग करावा लागणार आहे. या दोन्हीही सुविधा तिन्ही गॅस ( एचपी, भारतगॅस आणि इंडियन गॅस ) एजन्सीजसाठी उपलब्ध आहेत.

सामान्यांसाठी उत्कृष्ट ऑफर म्हणजे पे टीएममध्ये पेमेंट करण्यापूर्वी ‘FREEGAS’ या कूपनचा वापर केला तर मोफत गॅस सेवा मिळणार आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments