एकदम जुनं

बेभान झालेल्या मुंबईतील कापड गिरण्यांचा अंत कसा झाला?

पुढे कापड गिरण्यांचं काय झालं, गिरण्यांमध्ये काम करणाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागला, गिरणी मालकांसह तेथील कर्मचाऱ्यांची काय हालत झाली, हेच आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

End of Textile Mills : मुंबई ही एकेकाळची कापसाच्या सोन्याने माखलेली नगरी होती. ते होण्यामागे ब्रिटिशांचा हात होता, हे नक्कीच. 1853 पासून कापडांच्या गिरण्यांना सुरुवात झाली ती 1885 पर्यंत मुंबईने चांगलीच प्रगती केली होती. मागील लेखात कापसामुळे मुंबई किती प्रगतशील झाली होती, हे आपण पाहिलं, (तो लेख वाचण्यासाठी क्लिक करा एकेकाळी शेअर मार्केटपेक्षा कापसामुळे मुंबईला सातासमुद्रापार ओळख मिळाली होती.) या लेखात कापूस आणि कापड गिरण्यांचा अंताकडे कसा प्रवास सुरु झाला, हे पाहणार आहोत. (End of textile mills in Mumbai)

ब्रिटीश कंपन्यांच्या सपोर्टमुळे 1885 सालात मुंबईमध्ये विदर्भाचा कापूस खपू लागला. गिरण्यांची उभारणी होऊ लागली. कापसासह कापडांची आयात – निर्यात होऊ लागली. मात्र त्याच ब्रिटिशांच्या राजकीय खेळीमुळे मुंबईत उदयास आलेला कापडी व्यवसाय पुन्हा डबघाईस जाण्यास सुरुवात झाली. (What happened to textile mills in Mumbai?)

कापूस उद्योगामुळे ताडदेव, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, एल्फिस्टन या परिसरात मोठ्या प्रमाणात गिरण्या पसरल्या होत्या. मात्र परदेशात आयात निर्यात होणाऱ्या कापसावर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे परिणाम झाला. उदाहरण द्यायचं झाल्यास 1914 ते 18 च्या दरम्यान पहिलं महायुद्ध झालं. त्यात ब्रिटीशांनी सगळं लक्ष युद्धावर दिलं. जहाजांचा वापर शस्त्रांच्या वाहतुकीसाठी होऊ लागला आणि याचाच परिणाम म्हणून भारतात येणारा कापड आणि भारतातून बाहेर जाणारा कापूस या दोघांवरही बंधणे आली. त्यामुळे भारतातील कापसाची किंमत कमी झाली आणि कापडाला प्रतिस्पर्धी उरला नाही. मात्र उद्योगाच्या चढउतारामुळे हळू हळू गिरण्या बंद होण्यास सुरुवात झाली. (Why did textile mills move out of Mumbai?)

पुन्हा 1939 सालात दुसऱ्या महायुद्धाची घोषणा झाली. यात निर्णय झाला की गिरण्यांमध्ये तयार होणाऱ्या एकूण कापडापैकी सर्वाधिक कापड सैन्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कापड उद्योगाला पुन्हा सुवर्ण संधी आली, मात्र भारताला स्वातंत्र मिळाल्यावर कापड उद्योगावरील लक्ष औषधे, अभियांत्रीकी आणि खतांवर भर देण्यास सुरुवात झाली. यामुळे ठळकपणे कापड उद्योगांवर परिणाम होऊ लागला. यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून 1955 साली नायलॉन आणि पॉलिएस्टरचे कापड भारतात येऊ लागले आणि भारतातल्या सुती कापडाची मागणी खालावली. (When did textile mills end?)

या सागळ्या गिरण्यांच्या उतारचढावामुळे कामगारांवर थेट परिणाम होऊ लागला. कामगारांचा अतिरिक्त पगार, बोनस या गोष्टी मिळणं बंद झालं, त्यामुळे संप नावाचा प्रकार उदयास आला. एकाचवेळी दीड लाख कामगारांनी आंदोलन पुकारले होते, ज्यामध्ये 30 लाख महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. (What happened to cotton mills in Mumbai?)

गिरण्यांच्या उतारचढावामुळे आणि संपामुळे गिरण्यांचे सुग्गीचे दिवस संपले. सोबतच गिरण्यांचं जे काही अस्तित्व होतं, तेही हळू हळू संपू लागलं. जे गिरण्यांमध्ये कामाला होते, ते पैशांच्या गरजेसाठी मिळेल तो धंदा करु लागले, कोणी भाजी विकायला तर कोणी चहा विकण्यास सुरुवात केली. काहींनीतर घरचा रस्ता धरला. ज्यांना काहीच जमलं नाही, ते गुन्हेगारीकडे वळले आणि त्यातलाच एक व्यक्ती म्हणजे अरुण गवळी.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments