फेमस

Google Job : तब्बल 50 वेळा मुलाखत दिल्यानंतर गूगलमध्ये नोकरी

तब्बल 50 हून अधिक वेळा मुलाखत दिल्यावर बिहारमधील संप्रीती यादव या 24 वर्षीय तरुणीला गूगलमध्ये नोकरी मिळाली.

Google Job : अनेक लोक भारतात दररोज नोकरीसाठी मुलाखत देतात. अनेक वेळा मुलाखत दिल्यानंतर आपल्याला पाहिजेल तशी नोकरी मिळते. आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तसेच बिहारमधील एका मुलीच्या कष्टाचे चीज झाले आहे. तिने तब्बल 50 हून अधिक वेळा मुलाखत दिल्यावर तिला गूगलमध्ये नोकरी मिळाली.

संप्रीती यादव या 24 वर्षीय तरुणीने स्वतःचे स्वप्न साकारत गूगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळवली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व सोशल मीडियावर तिच्या या जिद्दीमुळे ती अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरली आहे. संप्रीती ही मूळची बिहारची असून ती मधूबन जिह्यातील हरलाखी ब्लॉक विभागात राहते. दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून कंप्युटर सायन्समध्ये 2021 मध्ये संप्रीती बी टेकचं शिक्षण घेऊन संप्रीती उत्तीर्ण झाली. तिने दिलेल्या मुलाखतीच्या लिस्टमध्ये गुगलचेही नाव होते.

तिला गूगलच्या आधी मायक्रोसॉफ्ट मधूनही ऑफर आली होती. तसेच तिला एवढ्या मुलाखती दिल्यानंतर एकाच वेळेस 4 वेगवेगळ्या कंपनीने ऑफर दिल्या होत्या मात्र तिने गुगलची ऑफर स्वीकारली. गूगल टीमकडून तिची या मुलाखती दरम्यान 9 फेऱ्या ऑनलाईन घेण्यात आल्या. ही संपूर्ण मुलाखत ऑनलाईन होती. तसेच तिने सर्व मोठ्या मोठ्या कंपनीची माहिती गोळा केली होती, त्याबद्दल वाचन केले होते आणि तेच तिला फार उपयोगी आले.

तिला गूगलकडून 1 कोटी 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. गूगलच्या या पॅकेजपेक्षा मला लंडन च्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली हेच फार समाधानकारक आहे असे संप्रीतीने सांगितले.

तिच्या या स्वप्नांचा पूर्ण प्रवास हा खडतर आणि कठीण होता. संप्रीतीला आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments