फेमसराजकारण

राज्यपाल कोशारी स्वत: किचनमध्ये गेले आणि ‘तो’ पदार्थ बनवताना कर्मचारी अवाक झाले

राजभवनात स्वतः महामहिम कोशारीजींनी कर्मचाऱ्यांसमोर स्वतःसाठी चहा बनवला तेव्हा....

Bhagat Singh Koshyari Statement : राज्यपाल भगत सिंग कोशारी यांनी राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर देखील अनेकवेळा राज्यपाल विरड महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत होता. असाच काहीसा वाद पुन्हा उफाळून येत आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं आहे. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. अस वक्तव्य केल्याने राज्यपालांवर अनेक स्तरातून टीका केली जात आहे.

महाराष्ट्रात राज्यपाल आले तेव्हापासून अनेक किस्यांमुळे राज्यपाल चर्चेचा विषय ठरले होते. राज्यपाल नियुक्त12 आमदार असोत अथवा पदवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे असुद्या यावरून राज्यपाल अगदी चर्चेचा विषय ठरले आहेत.

असाच रंजक किस्सा राजभवनात घडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील 78 वर्षीय कोशारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणूम नेमले. ते नेहमी साधं धोतर, खादीचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट त्यावर काळ्या रंगांची टोपी असा त्यांचा पेहराव. भगत सिंग कोशारी यांनी कारभार स्वीकारून जेमतेम 50 दिवस झाले होते.

राजभवणातील एका कर्मचाऱ्याने पत्रकारांना हा किस्सा सांगितला होता, लेखक कमलेश सुतार यांच्या 36 दिवस या पुस्तकात या किस्स्याचे वर्णन केले आहे. कोशारी यांना पहाटे लवकर उठायची सवय होती. पहाटे लवकर उठून सुर्योदयापूर्वी ते चहा घेतात. सुरवातीला तिथल्या स्टाफला त्यांचा दिनक्रम माहीत नव्हतं, एके दिवशी स्टाफ गाढ झोपेत असताना कोशारी सवयीप्रमाणे सुर्योदयापूर्वी उठले आणि थेट राजभवणातील किचनमध्ये गेले. त्यांच्या येण्याने काही कर्मचाऱ्यांना जाग आली. महामहिम स्वतः स्वयंपाक घरात आलेले पाहून सर्वजण आश्चर्य चकित झाले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं, काळजी करू नका मला चहा पत्ती आणि साखर कुठे आहे तेवढे सांगा मी स्वतः माझ्या साठी चहा बनवून घेईन. अत्यंत साध्या राहणीमानाने भगत सिंग कोशारी यांनी सर्वांची मन जिंकली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments