क्राईम

Hindustani Bhau Arrested : हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेताच पोलिसांनी केलं महत्वाचं काम

31 जानेवारी रोजी मुंबईतल्या धारावीमध्ये 10 आणि 12 च्या मुलांची गर्दी जमली होती.

Hindustani Bhau Arrested : 31 जानेवारी रोजी मुंबईतल्या धारावीमध्ये 10 आणि 12 च्या मुलांची गर्दी जमली होती. ही गर्दी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी होती. युट्यूबर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिदुस्तानी भाऊने ही गर्दी जमवली होती, असं आता म्हटलं जात आहे. हिंदुस्तानी भाऊच्या इन्स्टाग्रामवर विद्यार्थ्यांना चिथावणी देणारे अनेक व्हिडीओ live स्वरूपात असल्याचंही पोलिसांच्या समोर आलं आहे.

विद्यार्थ्यांना चिथावणी देणे, हजारो विद्यार्थ्यांना एकत्र जमण्याच्या सूचना देणे अशा अनेक आरोपांच्या आधारे धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला आपल्या ताब्यात घेतलं आहे.

धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला 1 फेब्रुवारीच्या सकाळी अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर सगळ्यात आधी हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर भाऊला सकाळी दहा वाजताच्या सुमारास बांद्रा न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते, याला हिंदुस्तानी भाऊने प्रोत्साहन दिले होते, त्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप आता हिंदुस्तानी भाऊवर केला जात आहे.

31 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी आंदोलन झाले होते, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी हिंदुस्तानी भाऊ हजर होता. स्वतः हजर राहून विद्यार्थ्यांच्या गर्दीचा त्याने व्हिडीओ केला होता.

नेमकं प्रकरण काय?

10 आणि 12 च्या परीक्षा ऑफलाईन होण्याची घोषणा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केलाय. संपूर्ण क्लास ऑनलाइन आणि परीक्षामात्र ऑफलाइन कशा काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. या सगळ्यावरून हिंदुस्तानी भाऊनेही आपलं मत मांडल होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments