फेमस

एका व्यक्तीचं निधन झालं आणि झटक्यात Valentine’s Day सुरु झाला

आपल्या संस्कृतीवर अफाट प्रेम असलेल्या असलेल्या भारताने पश्चिमात्य संस्कृती आत्मसात करून 1992 नंतर भारतात व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day Celebration In India) साजरा करण्यास सुरुवात केली.

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day), प्रेमाचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आपले आपल्या प्रेयसीवर असणारे प्रेम, आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांवर असणारे प्रेम या दिवशी व्यक्त करण्याची चांगली संधी असते. प्रत्येक गोष्टीचा विशेष दिवस असतो. जसे आनंद साजरा करण्यासाठी सण-वार राखून ठेवलेले असतात, तसेच प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस राखून ठेवला जातो, असे म्हंटले जाते. या दिवशी जगभरात प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र या प्रेमाच्या दिवसाची नेमकी कहाणी काय आहे? ‘व्हॅलेंटाईन डे’ 14 फेब्रुवारीला (14 February Valentine Day) हा दिवस साजरा करण्यास कशी आणि कुठून सुरुवात झाली? (History Of Valentine Day) खास व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण त्याचा नेमका इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत.

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास नेमकी सुरुवात कुठून झाली?

व्हॅलेंटाईन डे, नेमकी सुरुवात (Valentine Day Background) कशी झाली, आणि प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन असेच नाव का पडले हे आपण पाहुयात. व्हॅलेंटाईन डे हे नाव पडण्यामागचं कारण आहे, संत व्‍हेलेंटाइन. रोममध्ये संत व्हॅलेंटाईन (Saint Valentine) नावाची एक व्यक्ती होती. ज्यांना इसवी सन 270च्‍या फेब्रुवारी महिन्‍याच्‍या मध्‍यास दफन करण्‍यात आले. याचे कारण त्‍यावेळी सम्राट क्‍वॉलिडियसचे रोममध्‍ये राज्‍य होते. क्‍वॉलिडियसच्या म्हणण्यानुसार लग्‍न केल्‍यामुळे पुरूषांची शक्‍ती आणि बुद्धी कमी होते. त्‍यामुळे कोणत्‍याही सैनिकाने आणि अधिका-याने लग्‍न करू नये असा जबरदस्ती नियम बनवला. त्यावेळी संत व्हॅलेंटाइनने क्‍वॉलिडियसच्या या आदेशाला विरोध केला. तेव्‍हापासून संत व्हॅलेंटाइनच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ रोममध्ये (Rome Started First To Celebrate Valentine’s Day) प्रेम दिवस म्‍हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाऊ लागला.

रोमची व्हॅलेंटाईन डेची संस्कृती आपल्या भारतात कशी आली?

रोममधून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. आपल्या प्रियजनांना प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाबाचे फुल देणे, भेटवस्तू देणे यास सुरुवात होऊ लागली. जसजसे देश प्रगत होत गेले, तसतशी आजूबाजूच्या देशांनी देखील हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या भारतात 1992 आधी व्हॅलेंटाईन डे चे अस्तित्व नव्हते. 1992 नंतर भारत आधुनिकतेच्या वाटचालीकडे जाऊ लागला. घराघरात रेडिओ, टिव्ही येऊ लागले. पाश्चिमात्य संस्कृतीचे दर्शन घडू लागले. 1992-93 च्या भारतीय वृत्तपत्रात व्हॅलेंटाइन डेचा विशेष उल्लेख नसला तरी 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून वृत्तपत्रांमधून व्हॅलेंटाइन डेसाठी विशेष लेख वाचायला मिळाले. लोक संस्कृतीआत्मसात करायला लागले, आणि भारतात देखील हळूहळू व्हॅलेंटाईन डे साजरा (Valentine Day Celebration In India) करण्यास सुरुवात झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments