क्राईम

Hit and Run : फुगे विकणाऱ्या महिलेचा हिट अँड रनमध्ये मृत्यू, कसा घडला प्रसंग

मुंबईत मंगळवारी रात्री बोरिवली पश्चिममध्ये 29 वर्षीय फुगे विकणाऱ्या महिलेला तिच्या 5 महिन्याच्या बाळाला एक भरधाव कारने उडवले आणि कार चालकाने पळ काढला.

Hit and Run : मुंबईत मंगळवारी रात्री बोरिवली पश्चिममध्ये 29 वर्षीय फुगे विकणाऱ्या महिलेला तिच्या 5 महिन्याच्या बाळाला एक भरधाव कारने उडवले आणि कार चालकाने पळ काढला. या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे 5 महिन्याचे बाळ जखमी झाले. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

ही घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास कोरा केंद्र सिग्नलच्या येथील सुमन नगर ब्रिजच्या इथे घडली. मृत महिलेचे नाव लाडबाई भावरिया (29) असून ती तिच्या पती धनराज (30) व लहान मुलासोबत (रिवांश, 5 महिने) मीरा भाईंदर इथे राहत होती आणि रोज बोरिवलीला फुगे व बल्ब विकण्यासाठी येत असत.

तसेच ते मंगळवारी देखील सकाळी 9 च्या सुमारास बोरिवलीला कामासाठी आले. लाडबाई तिच्या मुलासोबत कोरा केंद्र सिग्नलच्या इथे थांबली आणि तिचा पती भट्टाड रोडच्या इथे फुगे आणि बल्ब विकण्यासाठी गेला.

रात्री 8 च्या सुमारास धनराजला एका विक्रेत्याने लाडबाई आणि रिवांशच्या अपघाताबद्दल सांगितले. तो तातडीने तेथे गेला आणि त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्या हॉस्पिटलमध्ये लाडबाईचा उपचारादरम्यान रात्री 2.30 च्या सुमारास मृत्यू झाला आणि रिवांशला हाताला फ्रॅक्चर झाले.

पोलीसांनी सांगितलेल्या माहिती नुसार घटनास्थळी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा निकामी झाला असून इतर कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे. ‘कार चालवणाऱ्या व्यक्तीचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि ती खाली कोसळली. अपघातात सामील असलेली कार इलेक्ट्रिक कारसारखी दिसते आहे. आम्ही लवकरच आरोपींचा शोध घेऊ,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments