मुंबई इंडियन्सची ‘या’ 5 खेळाडूंवर नजर, 2022 च्या IPL CUP साठी ‘करो या मरो’
सर्व फ्रँचायझी आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये खेळाडुचा लिलाव होईल आणि कोणत्या संघाला कुठला धुरंदर खेळाडू मिळाला आहे, याचं उत्तर मिळेल

Mumbai Indians : सर्व फ्रँचायझी आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये खेळाडुचा लिलाव होईल आणि कोणत्या संघाला कुठला धुरंदर खेळाडू मिळाला आहे, याचं उत्तर मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संघ मालकांनी आपल्याला कुठला खेळाडू हवाय, याची यादीही करून ठेवली आहे. गेल्या वर्षी कुठल्या खेळाडूने यशस्वी कामगिरी केली नाही, त्याला बाजूला सारून दुसऱ्या खेळाडूला घेण्यासाठी अनेक संघ मालक आणि व्यवस्थापक पुढे सरसावले असतील. या सगळ्यात मुंबई इंडियन्सबद्दलची चर्चा जोरदार सुरु आहे.
IPL 2022 मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यावेळी 590 खेळाडूंचे भवितव्य 10 संघ मालक आणि व्यवस्थापकांच्या हाती असेल. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना आयपीएल 2022 साठी त्यांच्या संघात कायम ठेवले आहे. मात्र इतर कुठल्या खेळाडूंना मुंबई इंडियन्स घेण्याच्या तयारीत आहे, हेच आपण आज पाहणार आहोत.
ट्रेंट बोल्ट
ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे. जो आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता. त्याने गेल्यावर्षी समाधानकारक प्रफॉर्मन्स केला होता. ट्रेंट बोल्टने आतापर्यंत 75 कसोटी सामन्यांमध्ये 300 खेळाडूंना तंबूत पाठवलं आहे. ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्स संघाचा जुना आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. बोल्टने 2020 च्या मोसमात 25 विकेट घेत मुंबईला 5 व्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राशिद खान
सनरायझर्स हैदराबादने अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानला सोडले आहे. आयपीएल 2022 संघांनी त्यांची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत स्टार फिरकीपटू राशिद खान नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहे. 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघ अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खानला विकत घेऊ शकतो.
आवेश खान
आवेश खान हा उगवता गोलंदाज आहे. IPL 2021 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आवेश खानला दिल्ली संघाने कायम ठेवले नाही. आवेश खान गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून समोर आला होता. या युवा भारतीय गोलंदाजाने अवघ्या 16 सामन्यात 24 विकेट घेतल्यात. याच कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघ त्याला विकत घेऊ शकतो.
ईशान किशन
मुंबई इंडियन्सची आपला ‘पॉकेट डायनामाईट’ खेळाडू इशान किशनवर लक्ष असणार आहे. 2020 च्या मोसमात, ईशान षटकार मारण्यात आघाडीवर होता, त्यानंतर त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. ईशानने IPL च्या 61 सामन्यांमध्ये 1452 धावा केल्या आहेत.
राहुल त्रिपाठी
IPL 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा राहुल त्रिपाठी आजही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केकेआरसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल त्रिपाठी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 15 डावात 30 च्या सरासरीने 395 धावा केल्या आहेत. 2 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141 राहिला आहे.