क्राईम

सगळ्यात मोठ्या गॅंगस्टरला ठार केलं आणि पोलिसांनाच ओरडा खावा लागला

ज्यावेळीस पोलिसांकडे साधे रायफल असायचे, त्यावेळेस याच माकडवाला गँगकडे एके-56 असायची. त्याच्या जिवंतपणाच्या कारकिर्दीत त्याच्यावर 25 खुणांचे आरोप होते.

Subhash Makadwala History : सण 1992-93 ची वेळ. दाऊद इब्राहिमची टोळी आणि त्यात होता सुभाष माकडवाला. आता सुभाष माकडवाला साधा नव्हता. ज्यावेळीस पोलिसांकडे साधे रायफल असायचे, त्यावेळेस याच माकडवाला गँगकडे एके-56 असायची. त्याच्या जिवंतपणाच्या कारकिर्दीत त्याच्यावर 25 खुणांचे आरोप होते. (How Subhash Makadwala was killed, plan of Pradip Sharma, Vijay Salaskar)

हॉटेल्स मालक, शेअर ब्रोक्रर्स, चित्रपट निर्माते, अभिनेते आणि अशीच धनवान माणसं सुभाषच्या नजरेत असायची. अशाच लोकांना तो घेरायचा आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांना लुटायचा. इतकच नाही तर ज्या लोकांना मारून काहीच फायदा होत नसे, अशा लोकांनाही तो राग आल्यावर सोडत नसे. असा खतरनाक डॉन.

1930 साली माकडवाला समाज मुंबईत आलेला. तसं या समाजातल्या महिलांना भविष्य सांगता येत होतं, मात्र मुंबईतल्या विकासापुढे ती कला जास्त काळ टिकली नाही, म्हणून पोटापाण्यासाठी केरसुणी, झाडू बनवणे, टोपल्या तयार करणे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माकडांचा खेळ करणे. या समाजात गुंड प्रवृत्ती जन्माला येईल, असं या समाजालाही कधी वाटलं नव्हतं. पण ते झालं.

या सुभाषबद्दल एक किस्सा सांगायचा झाल्यास, त्याला एकदा पाकिस्तानची गायिका आवडली. त्या गायिकेवर याचा जीव जडला. त्याने तिला आपल्याकडे वळवायला वेळ लावला नाही, मात्र सुभाषने कधीच तिला चांगली वागणूक दिली नाही. प्रत्येकवेळी तिच्यावर आत्याचार करण्याआधी तिला तो गाणी म्हणालयला लावयचा. मात्र सुभाषच्या दहशतीमुळे त्या गायिकेनेही कधी पोलिसासंमोर ब्र काढलं नाही. असं सगळं होत असताना पोलिसांनी सुभाषचा गेम करायचं ठरवलं. (Subhash Makadwala Pakistani Actress)

त्यावेळी निरीक्षक होते शंकर कांबळे, आयुक्त होते हसन गफूर आणि ठिकाण होतं घाटकोपरमधील अमृतनगर. पोलिसांना टीप मिळाली की सुभाष माकडवाला त्याच्या इमारतीमधून बाहेर पडतोय. शंकर कांबळेंनी गफूर यांना कल्पना दिली. गफूर यांनीही ‘जिवंत अथवा मृत, पण माकडवाला मिळवायचाच’ असा आदेश दिला. शंकर कांबळे लगेच कामाला लागले. विश्वासू जोडीदारांना फोन फिरवला. त्यातले एक होते उपनिरिक्षक विजय साळस्कर आणि दुसरे होते प्रदीप शर्मा.

स्टेअरिंगवर साळस्कर, तर बाजुच्या सीटवर बसले 9 मीमीचा कार्बाईन घेऊन शर्मा. दोघेही मिळालेल्या पत्त्यावर गेले. सुभाषची आणि पोलिसांची गाडी आमनेसामने आली, सुभाषच्या गाडीत एकूण तिघेजण होते. त्यातला तिसऱ्याच्या नावावर कुठलंच क्राईम रेकॉर्ड नव्हतं. तरीही तो त्यांच्यासोबत होता. सुभाषची गाडी पुढे आणि पोलिसांची गाडी मागे. अमृतनगरमध्ये गाड्यांची रेस लागली, इकडून साळस्करांनी फायरिंगला सुरुवात केली, तिकडे सुभाषच्या गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा सुटला, गाडी थांबली, त्यातच सुभाषने लगेच मोठ्या फायरिंगला सुरुवात केली, तर इकडून साळस्करांनी सोबत आणलेल्या कार्बाईनने फायरिंग सुरु केली. चकमक काही सेकंदातच संपली. सुभाषसह त्याच्या गाडीतील सगळे ठार झाले. मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेचे पोलीस यशस्वी झाले. सगळ्यांनी या पोलिसांचं कौतुक केलं. सहाजिकच शंकर कांबळेही यांच्या कर्तबगारीने भारावून गेले.

शंकर कांबळेंनी स्वत: कौतुक करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी मुंबई पोलीस मुख्यालयाची वाट धरली, सोबत होते शर्मा, साळस्कर आणि इतर सहकारी. गफूर यांच्या दालनात सगळ्यांनी प्रवेश केला. भेटायला येण्याची गोष्ट गफूर यांना माहित नसल्याने त्यांनी या सगळ्यांना पाहताच आश्चर्य व्यक्त केलं, येण्यामागचं कारण शंकर कांबळेंना विचारलं, त्यांनी भेटण्यासाठी आणि शुरविरांचं कौतुक करण्यासाठी आल्याचं सांगितलं. मात्र यामुळे हसन गफूर चांगलेच संतापले. संताप पाहून सगळे चक्रावले, अखेर गफूर यांनीच स्पष्टीकरण दिलं. सुभाष माकडवाला याच्यासोबत ज्यांची हत्या झाली, त्यातील एकाचा कुठलाच क्राईम रेकॉर्ड नव्हता, तरीही या चकमकित तो मारला गेला, यामुळे मुंबईतील सगळ्यात मोठ्या गँगस्टरचा जरी गेम झाला असला, तरी मात्र निरपराधाला मारल्यामुळे शर्मा, साळस्कर, कांबळेंना ओरडा खावा लागला.

या लेखाचा संदर्भ एस. हुसेन झैदी यांच्या ‘भायखळा ते बँकॉक’ या पुस्तकातून घेतला आहे.

हेही वाचा

अरुण गवळी जेव्हा पत्रकाराला म्हणातो, ‘तू पार बूच लावलं मला’…
1993 च्या मुंबई हल्लातील गोष्टी समोर येणार, मोस्ट वॉन्टेड मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments