विद्यापीठ

HSC Board : 12 वी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट कसं काढावं, पहा काय आहेत अटी?

9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजल्यानंतर राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.mahasscboard.in यावर कॉलेज लॉगिन मध्ये शाळा आणि महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे.

HSC Board : महाराष्ट्रात बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजल्यानंतर राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.mahasscboard.in यावर कॉलेज लॉगिन मध्ये शाळा आणि महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे.

त्यानंतर शाळा आणि महाविद्यालयाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेले हॉलतिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना विनामूल्य द्यावी, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये अशी सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे. मार्च-एप्रिल 2022 च्या बारावीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता आजपासून हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर त्याचे वाटप त्यांनी करावे.

हॉलतिकीटची प्रिंट काढल्यावर त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही घेवून किंवा शिक्का मारून विद्यार्थ्यांना द्यावे. तसेच हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यममध्ये बदल करायचे असल्यास त्याची दुरुस्ती शाळा व कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावे,अशा सूचना मंडळाने प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

जर विध्यार्थ्यांकडून हॉलतिकीट हरवले तर त्याला दुय्यम प्रत देऊन त्यावर लाल शाईने शेरा मारावा, तसेच फोटोमध्ये सदोष असल्यास नवीन फोटो हॉलतिकीटवर चिटकवून संबंधित प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी शिक्का आणि स्वाक्षरी करुन संबंधित विद्यार्थ्याला द्यावी, अशी सूचना राज मंडळाकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments