घटना

पती पत्नीच्या जोड्या स्वर्गात नाही तर नरकात बनवल्या जातात? अस न्यायालयाने का म्हटलं?

पतीकडून सोन्याच्या नाण्यांची मागणी करण्यात आली, मारहाण करण्यात आली. तसेच घरासाठी तिच्या माहेराकडून 13 लाख घेतले असल्याच्या दावा पत्नीने तक्रारीत केला आहे.

पती-पत्नीमध्ये होणारा वाद तर घराघरातील सामान्य गोष्ट आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या एका जोडप्यामध्येदेखील असाच वाद झाला. पण वाद इतका वाढला की जोडप्यांना न्यायलयाचे दरवाजे ठोकायला लागले. त्या दोघांमधील भांडणे, एकमेकांवर केलेले आरोप पाहता न्यायलयानेदेखील म्हटले की,”लग्नाच्या गाठी स्वर्गात नव्हे तर नरकात बांधल्या जातात.” ( Husband and wife pairs are made in hell, not heaven? Why did the court say that? )

पत्नीने कौटुंबिक छळ आणि हुंडा मागितल्या संदर्भात पतीवर गुन्हा दाखल केला होता. पतीकडून सोन्याच्या नाण्यांची मागणी करण्यात आली, मारहाण करण्यात आली. तसेच घरासाठी तिच्या माहेराकडून 13 लाख घेतले असल्याच्या दावा पत्नीने तक्रारीत केला आहे. यावर पतीने प्रतिक्रिया देत सांगितले की,”पत्नीने केवळ घराच्या इंटेरियरचा खर्च केला. घरासाठी मी एकूण 90 लाखाचे कर्ज काढले होते . पत्नीला महागडा मोबाईल घेऊन दिला, तिला फिरायला मॉरिशसला घेऊन गेलो.”

न्यायालयाच्या मते हे वाद विकोपाला गेले असून ते एकत्र राहणे शक्य नाही आणि पतीला कोठडी मिळण्याची गरज नाही. म्हणून 30 हजार रुपयांवर पतीला जमीन मंजूर झाला आहे. पती पत्नी मधील वाद जरी सामान्य गोष्ट असली, तरी ते कधी कधी इतके वाढतात की त्यांच्या संसाराला तडा जातो. म्हणून या प्रकरणावर ‘ लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही तर नरकात जुळतात, असा शेरा न्यायलयाने दिली आहे.

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments