Sanjay Raut on Income Tax : महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहे का? संजय राऊतांचा भाजपाला सवाल
शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Sanjay Raut on Income Tax : शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महापालिकेच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे तर ही कारवाई तर नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यामुळे सेंट्रल एजन्सीला केवळ महाराष्ट्रातच काम आहे किंवा पश्चिम बंगालमध्येच काम आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे. आम्ही या सर्व गोष्टी नमूद करत आहोत. जनताही पाहत आहे. जे शोधायचं आहे. शोधू द्या. ढुंढते रह जाओगे, असं संजय राऊत म्हणाले.
गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड सुरू आहे. 3 दिवसांपूर्वी सकाळीच आयकर विभागाने धाड टाकली. काल जाधव कुटुंबानी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे की कोणीही गोंधळ करू नये या कारवाईला समोर जाण्यास आम्ही समर्थ आहोत.