International : ज्या भारतीयांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण ते लोक ‘या’ 7 देशात जाऊ शकतात…
7 देश असे आहेत ज्यांनी लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या भारतीयांना प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी प्रवाशांवर निर्बंध लावले होते. परंतु काही देशांनी आता निर्बंध शिथिल केले आहेत.

भारतात अनेक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. आता रेल्वे, बस,रिक्षा, मॉल, इ. सर्वच ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना प्रवेश मिळतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा देखील बंद होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी प्रवाशांवर निर्बंध लावले होते. परंतु काही देशांनी आता निर्बंध शिथिल केले आहेत. 7 देश असे आहेत ज्यांनी लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या भारतीयांना प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.
1. थायलंड – आता थायलंडने देशाचे पर्यटन पुन्हा सुरू करण्यासाठी निर्बंध शिथिल करून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता नाही.
2. युके – येणाऱ्या 11 फेब्रुवारीपासून लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या भारतीयांना युकेमध्ये प्रवेश करताना प्रवासापूर्वी कोरोना चाचणीची गरज नाही.
3. सायप्रस – भारतीयांना मार्च महिन्यापासून सायप्रस देशाला भेट देण्यासाठी कोरोना चाचणीची गरज नाही.
4. व्हिएतनाम – व्हिएतनाम त्यांच्या काही मार्गदर्शन तत्वानुसार प्रवाशांना प्रवेशाची परवानगी देत आहे.
5. इस्राईल – इस्राईल देशाही त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देत आहे.
6. सेंट लुसिया – सेंट लुसियामध्ये आता लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवेश देण्यात आला आहे. पण हे प्रवासी फक्त सरकारी मान्यताप्राप्त हॉटेल्समध्येच राहू शकतात.
7. सिंगापूर – सिंगापूरला जाण्यासाठी प्रवासापूर्वी लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक नाही.