स्पोर्ट

IPL सुरु होण्याआधीच MI जिंकली; बाकीचे संघ झाले नाराज

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरु होण्यासाठी काही आठवडे शिल्लक आहेत. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार IPL 2022 मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल आणि ही भारतातच खेळवली जाईल. असं असतानाही मुंबई इंडियन्स संघ वगळता बाकीच्या संघांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना नियमांना लक्षात घेऊन BCCI ने मोठा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे IPL 2022 चे सगळे सामने फक्त महाराष्ट्रात खेळवले जातील. त्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न, वानखेडे, डीवाय पाटील स्टेडियम आणि एमसीए स्टेडियम, पुणे या मैदानांवर हे सामने खेळवले जातील. मात्र याच निर्णयामुळे अनेक संघ नाराज झालेत.

अनेक संघ मालकांचं म्हणणं आहे की या BCCI च्या निर्णयामुळे फक्त मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंड मिळेल. मुंबई इंडियन्सला घरचं मैदान मिळेल, हे योग्य नाही, असंदेकील अनेक संघांचं म्हणणं आहे.

IPL 2021 चा विचार केल्यास कोणत्याही संघाला होम ग्राऊंडचा फायदा झाला नव्हता. उलट सगळे सामने परदेशात खेळवले गेले होते.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील तीन स्टेडियममध्ये 55 सामने खेळवले जातील, तर 15 सामने पुण्यात खेळवले जातील. सर्व 10 फ्रँचायझींना ब्रेबॉर्न आणि पुणे येथे प्रत्येकी तीन सामने खेळावे लागतील तर वानखेडे आणि डीवाय पाटील येथे चार सामने खेळावे लागतील. यामुळे या मोसमात मुंबईचा संघ हा एकमेव संघ असेल जो घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर चार सामने खेळेल.  (Wankhede Stadium, Brabourne Stadium and DY Patil Stadium are the three venues in Mumbai )

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments