Ipl Auction : IPL लिलावात थेट अंबानींना भिडणारी ती तरुणी आहे तरी कोण?
इशानसाठी एक सुंदर तरुणी थेट अंबानींनाच भिडल्याचे पाहायला मिळाली. या सुंदर तरुणीची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. किशनसाठी मुंबई इंडियन्सला इशानसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजावे लागले. आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सला भिडलेली ही सुंदर तरुणी आहे काव्या मारन.

Ipl Auction : गेल्या 2 दिवसांपासून बंगळुरू येथे आयपीएलचा लिलाव सुरू आहे. (Ipl Auction At banglaru) या लिलावात अनेक भारतीय खेळाडूंना करोडोंची बोली लावली जात असताना सर्वांच लक्ष एका सुंदर तरुणीकडे होत. ही सुंदर तरुणी हैद्राबाद संघाकडून बोली लावत होती. या लिलावात मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनला 15 कोटी 25 लाख रुपयांनी मुंबईने खरेदी केलं. पंरतु यावेळी मुंबई इंडियन्स ला ठशन हैद्राबादकडून दिली जात होती.
लिलावात ईशान किशनला मुंबई इंडिन्सने आपल्या संघात दाखल करून घेतले. पण यावेळी इशानसाठी एक सुंदर तरुणी थेट अंबानींनाच भिडल्याचे पाहायला मिळाली. या सुंदर तरुणीची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे.
किशनसाठी मुंबई इंडियन्सला इशानसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजावे लागले. आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सला भिडलेली ही सुंदर तरुणी आहे काव्या मारन.
काव्या ही सनरायझर्स हैदराबाद या संघाची सहमालकीण आहे. दक्षिणेमध्ये ‘सन टीव्ही’ सर्वात प्रसिद्ध आहे. या सन नेटवर्कची ती मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. आतापर्यंतची सर्वात महागडी भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी ही काव्या ठरली आहे. काव्याचे बाबा कलानिथी मारन यांनी सन नेटवर्क सुरु केले. मारन कुटुंबियांचे भारतीय राजकारणाशी जुने संबंध आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्याशी मारन कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत.
त्याचबरोबर कलानिथी मारन यांचे वडिल केंद्रीय मंत्री होते, तर त्यांचे बंधूंनीदेखील केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे काव्या एका मोठ्या घराण्यातून आली आहे. सनरायझर्स हैदराबादचे सामने जेव्हा असतात तेव्हा काव्या बऱ्याचदा स्टेडियमध्ये आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेली असते.
काव्याने चक्क अंबानींबरोबरच पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. जरी इशानला तिला आपल्या संघात घेता आले नसले तरी तिने मुंबई इंडियन्सला दिलेली जोरदार टक्कर सर्वांनाच भावली. त्यामुळेच काव्या ही दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.