स्पोर्ट

आयपीएलमध्ये कोणत्या संघाचे कोण आहेत मालक?

IPL Mega Auction : 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत ईशान किशनला आपल्या ताफ्यात सामील केलं आहे. आयपीएलच्या या हंगामात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या आहेत. त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. कोणते खेळाडू कोणत्या संघात असेल हे आज सायंकाळी नक्की होईल परंतु 10 संघाचे मालक कोण? काही संघाचे मालक एक आहेत तर काही सघांच्या मालकांनी टीमचे शेयर्स शेयर केले आहेत. यामध्ये आघाडीवर आहे मुंबई इंडियन्स.

मुंबई इंडियन्स संघाची मालकी श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. सामनाच्यावेळी त्यांची पत्नी नीता अंबानी या नेहमी संघासोबत दिसतात. या टीमचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहेत. आयपील मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. या संघाने तब्बल 5 वेळा जेतेपद पटकावले आहे.

मुंबई इंडियन्स नंतर यशस्वी संघाच्या यादीत चेन्नई सुपर किंगचा नंबर लागतो. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी या संघाचे नेतृत्व करतो. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मालकी हक्क इंडिया सिमेंट लिमिटेडकडे आहेत. एन. श्रीनिवासन या कंपनीचे अध्यक्ष आहेत. चेन्नईला मध्यंतरी चेन्नई संघाला फिक्सिंग प्रकरणी 2 वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

2020 च्या आयपीएल मोसमात फायनलपर्यंत पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा मालकी हक्क JSW ग्रुप आणि GMR ग्रुपकडे आहे. आधी या संघाची मालकी फक्त GMR ग्रुपकडे होती. पण त्यानंतर संघाने 50 टक्के शेअर्स JSW ला विकले.

आयपीएल मधील विस्फोटम टीम म्हणून बंगलोर संघाकडे पाहिलं जातं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालकी हक्क यूनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे आहे. आनंद कृपालु या संघाचे मालक आहेत. हा संघ 2016 मध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता.

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकी वाडिया ग्रुपचे नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाकडे आहे. दोघांनी सुरुवातीला हा संघ विकत घेतला होता. या दोघांशिवाय डाबर ग्रुपचे संचालक मोहित बर्मन आणि एपीजे ग्रुपचे करण पॉल यांची सुद्धा हिस्सेदारी आहे. एकत्रित मिळून पंजाबची जबाबदारी पार पाडली जाते.

राजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क शेअर्सनुसार अनेकांमध्ये विभागलेले आहेत. पिंटरेस्टचे संस्थापक अमीषा हथिरामानी, ब्रिटन एशियन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बडाले, फॉक्स कॉर्पोरेशनचे सीईओ लाचलन मर्डोक, रयान टकालसेविच आणि क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्यामध्ये मालकी हक्क विभागले गेले आहेत. प्रत्येकाकडे ठराविक टक्के शेअर्स आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स ही टीम बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा संघ म्हणून ओळखला जातो. शाहरुख खानची कंपनी रेड चिली एंटरटेनमेंटशिवाय अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता यांच्या मेहता ग्रुपकडे सुद्धा संघाचे मालकी हक्क आहेत

2008 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाचे मालकी हक्क डेक्कन क्रॉनिकल समूहाकडे होते. डक्केन चार्जर्स दिवाळखोर झाल्यानंतर सन टीव्ही नेटवर्ककडे या संघाची मालकी गेली. संघाचे नाव बदलून सनरायजर्स हैदराबाद करण्यात आले. सन टीव्ही नेटवर्क मनोरंजन क्षेत्र तसंच मीडिया हाऊसमधली एक मोठी कंपनी आहे. कालनिथी मारन यांच्याकडे मालकी हक्क आहेत.

यावर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळवले जाणार आहेत. यामध्ये गोयंका यांच्या आरपी-एसजी समूहाने लखनऊ फ्रेंचायजीसाठी 7 हजार 90 कोटींची बोली लावली होती. संजीव गोयंका यांच्याकडे संघाची मालकी असून संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स आहे.

सीवीसी कॅपिटल्सकडे अहमदाबाद संघाची मालकी आहे. त्यांनी 5 हजार 625 कोटी रुपये खर्च केले आहेत. गुजरात टायटन्स या संघाचे नाव आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments