आपलं शहर

Jio : धक्का बसताच जिओने मागितली माफी; पाठवले ढीगभर SMS, ग्राहकांना होणार हा फायदा

जिओकडून ग्राहकांना झालेल्या या त्रासामुळे जिओने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी 2 दिवस मोफत सेवा दिली आहे.

Jio : शनिवारी (5 फेब्रुवारी 2022) रोजी जिओच्या नेटवर्कमध्ये खूप अडथळा आला होता. त्यामुळे जिओ ग्राहकांना फोन करणे-येणे, मेसेज करणे-येणे यामध्ये खूप अडथळे निर्माण झाले होते. काही तांत्रिक दोषांमुळे जिओच्या नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे मुंबईसह अजून काही भागात जिओ ग्राहकांची सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. संध्याकाळी 7.30 वाजता हा तांत्रिक दोष दूर करून सेवा सुरळीत करण्यात आली.
मात्र आता जिओकडून ग्राहकांना झालेल्या या त्रासामुळे जिओने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी 2 दिवस मोफत सेवा दिली आहे. आणि प्रत्येक ग्राहकाला मेसेज करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

“प्रिय जिओ ग्राहक, तुमच्या सेवेच्या गुणवत्तेला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. आज सकाळी दुर्दैवाने तुमची आणि मुंबईतील काही इतर ग्राहकांची सेवा खंडित झाली. त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. आमच्या टीमने नेटवर्कबाबतचा हा तांत्रिक अडथळा काही तासातच दूर केला. मात्र, हा काळ नक्कीच सुखद नसणार हे आम्ही समझू शकतो. त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो.”

“प्रिय जिओ वापरकर्ता जिओवरील विश्वासाबद्दल धन्यवाद. काल तुमचा सेवेचा अनुभव आनंददायी नव्हता. त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. सदिच्छा हावभाव म्हणून, आम्ही तुमच्या नंबरवर 2-दिवसांची विनामूल्य अमर्यादित योजना लागू केली आहे. तुमच्‍या सध्‍याच्‍या सक्रिय प्‍लॅनची ​​मुदत संपल्‍यानंतर कंप्‍लिमेंटरी प्‍लॅन सक्रिय होईल. जिओ कुटुंबाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद.” असे जिओने आपल्या ग्राहकांना केलेल्या मेसेजमध्ये म्हंटले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments