एकदम जुनं

चक्क मंत्री Jitendra Awhad यांचे वडिल करायचे Arun Gawali च्या टोळीत काम

Arun Gawali च्या दारुच्या अड्ड्यावर वडिलांनी पैसे मोजले, 22 वर्ष स्टेशनवर झोपले; Jitendra Awhad यांनी सांगितली वडिलांची संघर्ष कथा

बोर्न रीबेल मविआ सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (13 फेब्रुवारी) एका ओबीसी मेळाव्यात हजेरी लावली. त्यावेळी आपल्या वडिलांची संघर्ष कथा सांगताना त्याचा संबंध अरुण गवळीशी आल्याने सर्वांचे कान टवकारले. मुंबईतील धारावीमध्ये राहत असताना माझ्या वडिलांनी काही काळ हमाली केली, त्याची त्यांनी कधी लाज बाळगली नाही. इकडे मेहनत केली, पण माझा बाप गावी गेला नाही. माझा बाप गावी शेती नव्हती म्हणून मुंबईत आला. जवळपास 22 वर्ष व्हीटी स्टेशनला झोपले. (Jitendra Awhad Share his Father’s Struggle)

अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर आव्हाडांच्या वडिलांनी केले काम

आपल्या वडिलांची संघर्ष कथा सांगताना आव्हाड पुढे म्हणतात, माझे वडील अरुण गवळीच्या (Arun Gawali) दारुच्या अड्ड्यावर पैसे  मोजण्याचे काम करायचे. तर दुसरीकडे माझी आई लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची. माझ्या आई वडिलांनी जगण्यासाठी संघर्ष केला. असं बोलत, होय, हाय मी वंजारी, असं आव्हाड म्हणाले. मी कशात कमी नाही, ना ज्ञानात, ना भाषेत. मी आज जसा आहे, तशी धमक तुमच्यात असेल तर सर्वांना धडकी भरेल. यावेळी, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे माझे नशीब उजाळले आणि की इथे पर्यंत येऊ शकलो, हे सांगायला आव्हाड विसरले नाही.

आरक्षण नव्या पिढीची लढाई

आव्हाड ओबीसी आरक्षणावर (Jitendra Awhad On OBC Reservation) बोलताना म्हंटले, मवीआने गरीबांसाठी कामे हाती घेतलीयेत. जेव्हा कुणा विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडचणी येतात तेव्हा जीव तुटतो. आम्हाला खरे आरक्षण हवे असून मेरीटमधून आमचे आरक्षण कुणीही काढू शकत नाही. आरक्षण ही नव्या पिढीची लढाई आहे, ती आपण लढली पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments