नमाजाआधीच मशिदीमधून घोषणा, हिजाब गरजेचा नाही; असं कुठेच लिहलेलं नाही…
नमाज अदा करण्याआधीच मशिदीमधून घोषणा झाली. हिजाबचा मुद्दा मध्ये येत नाही, कायदा जे सांगेल तो नियम सगळ्यांना पाळावा लागेल.

Jumma Mashidi on Hijab : हिजाबच्या संदर्भात देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलने होत आहेत, मुंबईच्या प्रमुख जुम्मा मशिदीने जुम्माच्या नमाजपूर्वी आणि नंतर शांतता राखण्यासाठी पुढाकार घेतला.
कर्नाटकातून सुरु असलेल्या वादाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे, मात्र देशातील अनेक राज्यांतून निषेध होताना दिसत आहे, अशा परिस्थितीत मुंबईतील मुख्य जुम्मा मस्जिदने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. जुम्माच्या प्रार्थनेपूर्वी आणि नंतर शांतता राखण्याची घोषणा करण्यात आली.
शुक्रवारच्या नमाजासाठी आलेल्या हजारो लोकांना प्रार्थनेपूर्वी सांगण्यात आले की, कायद्याच्या प्रक्रियेनुसार पुढे गेले पाहिजे, विनाकारण वाद वाढवू नका आणि शांतता राखा. सध्या सुरु असलेल्या वादात कोणी पडू नये. अरबी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ही घोषणा करण्यात आली होती.
त्याचा परिणाम नमाज पडणाऱ्यांवरही झाला. आपल्या सगळ्यांना कायदा पाळावा लागेल. केलेल्या घोषणेमध्ये काहीच चुकीचं नाही. त्याची कदर आम्हा सगळ्यांना करावी लागेल. अशावेळी मशिदीचे मुफ्ती अशफाक यांनी इंडिया टीव्हीशी मुलाखतीत याचा खुलासा केला. हिजाब हा वादाचा मुद्दा नाही. हिजाब घालणे बंधनकारक आहे, असे कुठेच लिहिलेलं नसल्याचं अशफाक यांनी सांगितलं.
“ज्या प्रकारे आंदोलन होत आहे ते योग्य नाही, तो कायदा आहे, संविधान आहे, त्याचे पालन करा. म्हणूनच आम्ही सतत शांततेचा संदेश देत आहोत, कोणालाही हिजाब घालण्याची किंवा काढण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. असंही मुफ्ती म्हणाले. शाळेचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत, त्यांचे पालन करा, कारण भारतात बरेच लोक राहतात, प्रत्येकाची स्वतःची भावना आहे.