शिवसेनेला किरीट सोमय्यांचे थेट आव्हान; ‘मी चौकशीला तयार’
Replayed Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय राऊत यांनी अखेर पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली.

Kirit Somaiya Replayed Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय राऊत यांनी अखेर पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. फक्त भाजपच नाही तर ED वरही तंग खेचून संजय राऊत यांनी संपूर्ण सुफडा साफ करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ED कडून झालेल्या कारवाया, केंद्र सरकारकडून आलेला दबाव हाच या पत्रकार परिषदेमागचा उद्देश होता. (Shivsena Press Conference)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रताप सरनाईक अशा अनेक नेत्यांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे वाघाला डिवचल्याचं चित्र संजय राऊत (Sanjay Raut On BJP Leader) यांनी उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या या पत्रकार परिषदेमधून समोर आला.
या संपूर्ण पत्रकार परिषदमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना टार्गेट केलेलं पाहायला मिळालं. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांच्यावर राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तसेच सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांची चौकशी करावी असे देखील संजय राऊत म्हणाले.
यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिलं आहे, 2017 मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामनाने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी, असे आव्हान भाजपा किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
सोमय्या यांनी म्हटले आहे की , ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत, आणखी 3 दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी आणि माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट , चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, असे देखील सोमय्या म्हणाले.
राऊतांनी घेतलेली हाय व्होल्टेज पत्रकार परिषदेनंतर उत्तर प्रतिउत्तराचे राजकारण सुरू झालेल आहे.