घटना

स्वर्गीय सूर हरपले; लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रिच कँडी रुग्णालयात 06 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

Lata Mangeshkar Death : भारतरत्न लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रिच कँडी रुग्णालयात 06 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत होती, मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली आणि प्राणज्योत मालवली. लतादीदींनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

शनिवारी सायंकाळी उशिरा लता मंगेशकर यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे लतादीदींची बहिण आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, असे अनेक दिग्गज लतादीदींना भेटायला आले होते.

शनिवारी आशाताईंनी लतादीदींच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती, लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनीही त्यांच्या तब्येतीबद्दल पत्रकारांना सांगितलं होतं. शनिवारी लतादीदींना अचानक व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, त्याआधी त्या ICU मध्ये दाखल झाल्या होत्या.

८ जानेवारीला दीदींना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं. लता मंगेशकर गेल्या 23 दिवसांपासून आयसीयूमध्ये होत्या. लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडण्यापूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

विशेष म्हणजे लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास होता. शनिवारी सकाळपासूनच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि माधुरी दीक्षित यांनीही चाहत्यांसह सोशल मीडियावर लता मंगेशकर यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments