राजकारण

Lata Mangeshkar Memorial : दीदींच्या स्मारकाबद्दलच्या राजकारणाला आला फुलस्टॉप, मुंबईत ‘या’ ठिकाणी बनणार स्मारक…

आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत स्मारकाच्या मागणीसंदर्भात विचार करून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

6 फेब्रुवारीच्या सकाळी 8 वाजून 12 वाजता मुंबईतील ब्रीचं कँडी रुग्णालयात भारताची गानकोकिळा म्हणून ओळखली जाणारी पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंतिमक्रिया दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडली. या क्रियेत अनेक दिग्गज कलाकारांनी आणि महाराष्ट्रासहित देशभरातील नेत्यांनीदेखील उपस्थिती दर्शवली. अंतसंस्कराच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारकडे भारतरत्न लता मंगेशकर यांचे भव्य दिव्य स्मारक जिथे अंतिम क्रिया झाली त्या ठिकाणी उभारण्याची मागणी केली. ( Lata Mangeshkar Memorial: Politics about Didi’s memorial came to a full stop, a memorial to be built at this place in Mumbai … )

निधनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या मागणी संदर्भात भाजपचे आमदार राम कदम यांनी जनतेच्या वतीने राज्य प्रशासनाला पत्र लिहले की, “ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्या ठिकाणी त्यांचे स्मारक बनले पाहिजे. लता दीदी जगभरातील संगीतप्रेमींचे प्रेरणास्रोत आहेत म्हणून त्यांच्या स्मारकाचे स्थळ प्रेरणास्थळ ठरेल.” राम कदम म्हणाले की,”ही केवळ त्यांच्या पक्षाची मागणी नसून संगीतप्रेमी आणि लता दीदींच्या चाहत्यांचीदेखील मागणी आहे.”

यावरून महाराष्ट्रात पुन्हा पुतळ्यांचे राजकारण सुरू झाले. काहींनी छञपती शिवाजी महाराज पार्कमध्ये स्मारक बांधण्याच्या मागणीला चांगला प्रतिसाद दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांनी मैदानात स्मारक बनवण्यास तीव्र विरोध केला. त्यांच्या मते, “मैदान हे जनतेसाठी बनवले गेले आहे आणि जनतेच्या सार्वजनिक स्थळी स्मारकाचे राजकारण करणे उचित नाही.” राम कदमांच्या या मागणीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील भाजपा नेत्यांना ‘ किमान लता दीदींच्या स्मारकावरून तरी राजकारण करू नका,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत स्मारकाच्या मागणीसंदर्भात विचार करून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आलेल्या निर्णयात भाजपा नेते कदमांच्या एका मागणीची पूर्तता झाली नाही आहे. कारण दीदींचा पुतळा छञपती शिवाजी महाराज पार्कमध्ये बनणार नसून स्मारक सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये बनणार आहे. यासाठी 1200 कोटी रुपयांची निधी उभारण्यात आली असून हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि आतंरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकॅडमीदेखील असणार आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments