राजकारण

Lata Mangeshkar Memorial : दीदिंच्या स्मारकाच्या झालेल्या वादावरून  पंडित हृदयनाथ मंगेशकर काय म्हणाले? जाणुन घ्या…

मुंबई विद्यापीठाच्या जागेवर 1200 कोटी निधीचे आंतरराष्ट्रिय दर्जाचे लता मंगेशकर यांच्या स्मरणात संगीत विद्यापीठ बनवण्यात येत आहे.

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshakar) यांच्या निधनाने जागतिक संगीतसृष्टीला मोठा धक्का बसला. त्यांच्या मृत्यूनंतरचे दोन दिवस राष्ट्रिय दुखवटा म्हणून पाळण्यात आले. मृत्यूनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राम कदम यांनी चाहत्यांच्या वतीने,”जिथे अंत्यसंस्कार पार पडले त्या ठिकाणी लता दीदींचे भव्य स्मारक उभारावे,” अशी मागणी केली.

बघता बघता या मागणीचे स्वरूप वादात निर्माण झाले. राजकीय वातावरण बिघडू लागले. पण या वादाला थांबवण्यास यावर लता दीदींचे धाकटे बंधू आणि भारतीय सुप्रसिध्द संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,” लता दीदींचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे व्हावे अशी आमची मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा बिलकुल नाही. तर कृपया करून स्मारकावरून राजकीय वातावरणात होणारा वाद थांबवावा. लता दीदींनी याआधी महाराष्ट्र शासनाकडे संगीत विद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती आणि दीदींची हि मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राउत यांनी आनंदाने मान्य केली होती. त्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सरकार आंतरराष्ट्रिय दर्जाचे लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करत आहे. तर या संगीत स्मारकापेक्षा मोठे आणखीन कोणतेही स्मारक होऊ शकत नाही.”

मुंबईतील सांताक्रुझ येथील कालिना कॉम्प्लेक्स मधील मुंबई विद्यापीठाच्या जागेवर 1200 कोटी निधीचे आंतरराष्ट्रिय दर्जाचे लता मंगेशकर यांच्या स्मरणात संगीत विद्यापीठ बनवण्यात येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments